• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, October 25, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

गुटखा तस्करीत अडकलेल्या पोलिसांना सहआरोपी करा

माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांची मागणी

admin by admin
October 21, 2023
in विशेष बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिव लाइव्हचा दणका : गुटखा प्रकरणी पाच पोलिसांची मुख्यालयात उचलबांगडी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – गुटखा तस्करीत अडकलेल्या नळदुर्ग पोलीस स्टेशनचे सपोनि सिद्धेश्वर गोरे, पोलीस निरीक्षक अंधारे यांच्यासह सात जणांची पोलीस मुख्यालयात उचलबांगडी करण्यात आल्यानंतर या सर्वांची तीन वेतनवाढ आणि पदोन्नती रोखण्यात आली आहे. या सर्व पोलिसांचे आरोपीबरोबर हितसंबंध असल्याचे उघड झाले असल्याने त्यांना निलंबित करून सहआरोपी करावे , अशी मागणी सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी केली आहे.

गुटखा तस्करी प्रकरणी नळदुर्ग पोलिसांनी कश्या प्रकारे तोडपाणी केली , याची मालिकाच धाराशिव लाइव्हने प्रसिद्ध केली होती. याप्रकरणी उपविभागीय अधिकारी नीलेश देशमुख यांनी सर्व पोलिसांना नोटिसा देऊन त्यांचे म्हणणे घेतले आणि नंतर चौकशी अहवाल पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना पाठवला होता, त्यानंतर पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी नळदुर्ग पोलीस स्टेशनमधील सपोनि सिद्धेश्वर गोरे, पोलीस उपनिरीक्षक अंधारे यांच्यासह सात पोलीसांची धाराशिव पोलीस मुख्यालयात बदली केली.

काय आहे प्रकरण ?

निगडी ( पुणे ) येथील निखिल ट्रान्सपोर्टचा आयशर टेम्पो ( क्रमांक एमएच २५, एजे १४८६ ) हा हैद्राबाद येथून गुटखा भरून नळदुर्ग पोलीस स्टेशनच्या हद्दीत येताच, दि. १९ जुलै रोजी रात्री गोलाई चौक, चिवरी पाटीजवळ काही तरुणानी जबरदस्तीने आडवून तो सपोनि सिद्धेश्वर गोरे यांच्या ताब्यात दिला होता.

गुटख्याचा आयशर टेम्पो ( क्रमांक एमएच २५, एजे १४८६ ) पकडल्यानंतर गुटखा तस्कर नकुल पंडित ( मूळ आडनाव साळवी ) हा चांगलाच चिडला आणि हप्ता देऊन देखील गाड्या पकडत असाल तर काय उपयोग म्हणून सुनावल्यानंतर गोरेनी त्या टेम्पोमधील गुटखा चालकांमार्फत अज्ञात ठिकाणी उतरवून, रिकामा टेम्पो दाखवून दि. २१ जुलै रोजी गुटख्याच्या गाड्या पकडणाऱ्या गणेश नागनाथ वचने ( वय १९ ) , सय्यद अमीर अझहर जहागीरदार ( वय २२), संदीप संजय राठोड , सुशील संजय राठोड, मिटू उर्फ इंद्रजितसिंह ठाकूर सर्व रा. नळदुर्ग यांच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल केला. टेम्पो चालक सहदेव माडजे रा. कोंडजी ता. लोहारा यास मारहाण करून १२ लाखाचा आयशर टेम्पो आणि खिशातील ३५ हजार जबरदस्तीने पळवून नेल्याचा गुन्हा या झिरो पोलिसांवर दाखल करण्यात आला होता.

पोलिसांच्या सांगण्यावरूनच आपण गुटख्याचा सदर टेम्पो ताब्यात घेतला पण पोलिसांनी वाटा देण्याऐवजी दरोड्याचा गुन्हा दाखल केल्याने हे झिरो पोलीस चांगलेच चिडले. यातील सय्यद अमीर अझहर जहागीरदार याच्या चुलत्याने सर्व पुरावे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना दिल्याने गोरेंची अवघ्या चार दिवसात पोलीस मुख्यालयात उचलबांगडी झाली.

त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अंधारे यांच्यासह सहा पोलीसांची धाराशिव मुख्यालयात उचलबांगडी करण्यात आली . त्यात पोलीस हेड कॉन्स्टेबल विशाल सागर, नेताजी दगडू गेजगे, विश्वनाथ शिंदे, नितीन राठोड, बलदेवसिंग ठाकूर आदींचा समावेश आहे.त्यानंतर आता सातही पोलीस कर्मचाऱ्यांची तीन वेतनवाढ आणि पदोन्नती रोखण्यात आली असून सर्वाना आता किमान तीन वर्षे पोलीस मुख्यालयातच ड्युटी करावी लागणार आहे

गुटखा तस्करीत अडकलेल्या पोलिसाना सहआरोपी करा

गुटखा तस्करीत अडकलेल्या नळदुर्ग पोलीस स्टेशनचे सपोनि सिद्धेश्वर गोरे, पोलीस निरीक्षक अंधारे आणि अन्य पोलिसांचे झिरो पोलीस यांच्याबरोबर अनेकवेळा मोबाईल संभाषण झाल्याचे सीडीआर चौकशीमध्ये मिळाले असून, चौकशी अहवालात तसे नमूद केले आहे. पोलिसांचे आरोपीबरोबर हितसंबंध असल्याचे उघड झाले असल्याने त्यांना निलंबित करून सहआरोपी करावे , अशी मागणी सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षक, विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस महासंचालक यांना देण्यात येणार आहे.

 

Previous Post

गर्भलिंग निदान कायद्याचे उल्लंघन : धाराशिवच्या डॉक्टरास एक वर्ष कारावास व दहा हजार रुपये दंड

Next Post

नळदुर्ग गुटखा तस्करीतील दोन आरोपींना जामीन मंजूर

Next Post
नळदुर्ग गुटखा तस्करीतील दोन आरोपींना जामीन मंजूर

नळदुर्ग गुटखा तस्करीतील दोन आरोपींना जामीन मंजूर

ताज्या बातम्या

धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

भूम : अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत लॉजवर लैंगिक अत्याचार

October 24, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

कळंब : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणाला लोखंडी कड्याने मारहाण

October 24, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

भूम : आयशर व पिकअपमधून जर्सी गायी अन् वासरांची अमानुष कोंबून वाहतूक; पांढरे देवी मंदिराजवळ भूम पोलिसांची कारवाई

October 23, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : समतानगरातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण; अज्ञात व्यक्तीविरुद्ध आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

October 23, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : ‘आमच्या आक्काला पैसे द्यावे लागतात’ म्हणत सीएनजी पंपावर तरुणावर प्राणघातक हल्ला

October 23, 2026

Recent Posts

  • भूम : अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत लॉजवर लैंगिक अत्याचार
  • कळंब : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणाला लोखंडी कड्याने मारहाण
  • भूम : आयशर व पिकअपमधून जर्सी गायी अन् वासरांची अमानुष कोंबून वाहतूक; पांढरे देवी मंदिराजवळ भूम पोलिसांची कारवाई
  • धाराशिव : समतानगरातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण; अज्ञात व्यक्तीविरुद्ध आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
  • उमरगा : ‘आमच्या आक्काला पैसे द्यावे लागतात’ म्हणत सीएनजी पंपावर तरुणावर प्राणघातक हल्ला
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!