धाराशिव जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार आज जिल्ह्यात दाखल झाले. आज महाशिवरात्रीच्या शासकीय सुट्टीमुळे त्यांनी अधिकृत पदभार स्वीकारला नसला तरी, त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन प्राथमिक माहिती घेतली.
गुरुवारी (२९ फेब्रुवारी) ते अधिकृतरित्या पदभार स्वीकारणार आहेत. नव्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर भ्रष्टाचार निर्मूलन, तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याला गती देणे आणि जिल्ह्यातील प्रशासन अधिक पारदर्शक करणे ही मोठी आव्हाने असणार आहेत.
पत्रकाराकडून स्वागत
धाराशिव जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी किर्ती किरण एच पुजार यांचे धाराशिव जिल्ह्यात स्वागत केले यावेळीआकाश नरोटे, कैलास चौधरी, जुबेर शेख, जफर शेख, सलीम पठाण, कुंदन शिंदे,मनोज जाधव,अहमद अन्सारी आदींनी स्वागत केले