यवतमाळच्या टिपेश्वर जंगलातून तब्बल ५०० किमी प्रवास करून टी-२२ वाघ धाराशिवमध्ये कसा पोहोचला? हे एक कोडं. पण त्याहून मोठं कोडं म्हणजे, तो दोन महिने झाले तरी वन विभागाच्या हाती लागत नाही!
📌 प्रवासाची गुप्त कथा:
🔹 मे २०२३: टिपेश्वर अभयारण्यात शेवटचं दर्शन
🔹 डिसेंबर २०२४: धाराशिवमध्ये धमक
🌲 पकडण्यासाठी अनेक ‘टीम’ पण हात हलवत परत!
🚩 आधी ताडोबा स्पेशल टीम आली, १५ दिवस जंगल सफारी करून परतली.
🚩 नंतर पुण्याची टीम दाखल झाली, एक महिना शोधमोहीम झाली, पण वाघ मोकाटच!
📍 ‘टी-२२’ चा धाराशिवमध्ये ‘Jungle Safari’
➡ रामलिंग अभयारण्य, बार्शी परिसर, भूम-वाशी परिसर आणि आता थेट धाराशिव शहराजवळील लेणी परिसर!
🎥 सोशल मीडियावर व्हायरल:
धाराशिवच्या लेण्यांमध्ये टी-२२ पाणी पित असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल!
⛰️ धाराशिव लेणी – वाघाचं ‘सेफ हाऊस’?
धाराशिव शहरापासून फक्त ४ किमी अंतरावर असलेल्या पडझड झालेल्या लेणीत वाघानं आश्रय घेतला का?
इथे कुणी फारसं येत नाही… मग हा वाघ ‘एकांतवास’ पसंत करतोय का?
🤔 आता पुढे काय?
वन विभागाला अजून किती वेळ लागणार? की टी-२२ स्वतःच ‘सुरक्षित मार्ग’ निवडणार?
धाराशिवकरांच्या मनात भीती आणि कुतूहलाचं द्वंद्व! 🚨🐾
Video