उमरगा : उमरगा शहरापासून जवळच असलेल्या तुरोरी गावाजवळ कर्नाटक राज्य परिवहन मंडळाची बस जाळण्यात आली होती , याप्रकरणी उमरगा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी नामे- अनिल काशीनाथ बिराजदार, वय 47 वर्षे, व्यवसाय- बस चालक, बॅच नं-1350, कल्याण कर्नाटक रोड ट्रान्सपोर्ट कार्पोरेशन बीदर विभाग, रा. घाटबोराळ, ता. हुमनाबाद जि. बीदर कर्नाटक हे करमाळा येथील बस क्र केए 38 एफ 1201 ही घेवून जात असताना दि. 30.10.2023 रोजी 20.30 वा. सु. एनएच 65 रोडवर तुरोरी येथे मराठा आरक्षणाचे अनुषंगाने काही अनोळखी व्यक्तीने बसचे समोर हातात दगड घेवून एक मराठा लाख मराठा, जय महाराष्ट्र असे घोषना देत बसकडे येवून बसवर दगड फेक करुन बस मधील पॅसेंजरना खाली उतरवले व डिझेल सिटवर टाकुन फिर्यादीस व कंडक्टर यांना धक्काबुक्की करुन हाताचापटाने मारहाण करुन आगकाडी ओडून बसला आग लावून संपुर्ण बस जाळून नुकसान केले. अशा मजकुराच्या फिर्यादी- अनिल बिराजदार यांनी दि.31.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे कलम 435, 336, 143, 147, 148, 149, 323, 353 भा. दं. वि. सं. सह सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंध अधिनियम कलम 3(2) (ई), 4 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
अपघातात एक ठार
येरमाळा : आरोपी नामे- आनंद दत्तात्रय येवले, व सोबत मयत नामे-अंगद रामभाउ सावंत, रा. बावी, ता. वाशी जि. धाराशिव हे दोघे दि.13.10.2023 रोजी 18.00 वा. सु. बावी शिवारातील गुरव शेतातील रस्त्यात येथुन मोटरसायकल क्र एमएच 25 ए.वाय. 0461 याचेवरून जात होते. दरम्यान आनंद येवले यांनी त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवून त्यांचे पाठीमागे बसलेला मयत नामे अंगद सावंत हा गाडीवरुन खाली पडून गंभीर जखमी होवून मयत झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी राजेंद्र रामभाउ सावंत, वय 42 वर्षे, रा. वाशी जि. धाराशिव यांनी दि.31.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 304 (अ) सह मो. वा. कायदा कलम 184अन्वये गुन्हा नोंदवला आहे.