परंडा :आरोपी नामे- 1)ज्ञानेश्वर संजय मिस्कीन, 2) संतोष संजय मिस्कीन 3) समाधान हनुमंत मिस्कीन, 4) कृष्णा हनुमंत मिस्कीन, 5) रोहीत नाना रेवडकर सर्व रा. डोमगाव ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि.27.12.2023 रोजी 23.00 वा .सु. मेघराज पेट्रोलपंप करमाळा रोड परंडा येथे फिर्यादी नामे-राहुल अशोक चौतमहाल, वय 30 वर्षे, रा. रेवणी भिमनगर परंडा ता. परंडा जि. धाराशिव, यांना व पेट्रोलपंप मालक हनुमंत पाटील यांना नमुद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून पेट्रोलचे पैसे मागण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- राहुल चौतमहाल यांनी दि.28.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे कलम 324, 323, 143, 147, 148, 149, 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
बेंबळी :आरोपी नामे-1)पोपट बलभिम ठवरे, रा. दाउतपुर ता. जि. धाराशिव यांनी दि. 23.12.2023 रोजी 21.30 वा. सु. चिखली शेत शिवार औटेच्य शेतात चिखली चौरस्ता येथे फिर्यादी नामे- बलभिम जगन्नाथ जाधव, वय 41 वर्षे, रा. दारफळ ता. जि. धाराशिव यांनी नमुद आरोपीस हात उसने दिलेले 70,000 ₹ मागीतल्याचा राग मनात धरुन नमुद अरोपीने फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, बियरच्या बाटलीच्या काचेने छातीवर मारहाण करुन गंभीर जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- बलभिम जाधव यांनी दि.28.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो. ठाणे येथे कलम 326, 323, 506, भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव :आरोपी नामे- 1)रणजीत मधुकर रणखांब, 2) अजीम गुलाब सय्यद दोघे रा.कुमाळवाडी ता. जि. धाराशिव यांनी दि.27.12.2023 रोजी 19.30 ते 20.00 वा. सु. कुमाहवाडी येथे फिर्यादी नामे- विश्वनाथ रामभाउ कांबळे, वय 34 वर्षे, रा. कुमाळवाडी ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी दुधाची गाडी का आडवली या काणावरुन जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, बेल्टने मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादीची पत्नी व सुकेशनी कांबळे व भाउ मनीष कांबळे यांनाही नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. व मनिष याचे मनगटावर बेल्टने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी- विश्वनाथ कांबळे यांनी दि.28.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 34 भा.दं.वि.सं. सह 3(1)(आर)(एस),3(2)(व्हि)(ए) अ.जा.ज.अ.प्र कायदा अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
शिराढोण :आरोपी नामे- 1)कमलाकर लिंबराज जाधवर, रा. ताडगाव ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.27.12.2023 रोजी 20.15 वा. सु. ताडगाव येथे फिर्यादी नामे- लिंबराज कोंडीबा जाधवर, वय 60 वर्षे, रा. ताडगाव, ता. कळंब जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने मला विचारुन का वहिनीला आणण्यासाठी धाराशिवला गेले नाही या कारणावरुन नमुद आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ करुन गाडीवरुन खाली ओढून कमरेच्या बेल्टने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- लिंबराज जाधवर यांनी दि.28.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो. ठाणे येथे कलम 324, 504, 506, भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.