उमरगा : आरोपी नामे-संभाजी बळीराम जाधव व सोबत मयत नामे- आकाश कालीदास पाटील, वय 25 वर्षे, दोघे रा. तलमोड, ता. उमरगा जि. धाराशिव हे दोघे दि.26.12.2023 रोजी 17.45 वा. सु. टोलनाका जवळ तलमोड येथुन कार क्र एमएच 25 एएस 5409 मधून जात होते.
दरम्यान आरोपी संभाजी जाधव यांनी त्यांचे ताब्यातील कार ही भरधाव वेगात, हायगई व निष्काळजीपणे चालवून रोडचे बाजूला कटड्याला धडकुन स्वता किरकोळ जखमी झाला. व आकाश पाटील यास गंभीर जखमी करुन त्याचे मरणास कारणीभुत झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अर्जुन मुर्लीधर सरवडे/साळुंके, वय 33 वर्षे, रा. तलमोड, ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.28.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 338, 304(अ) सह 184, मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मद्यपी चालकावर गुन्हा दाखल
उमरगा : आरोपी नामे-1) यशवंत धोंडीबा बनसोडे, वय 51वर्षे, रा. जुनी पेठ, उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव, हे दि.28.12.2023 रोजी 20.15 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 24 एए 1277 ही आरोग्य कार्नर येथे मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
वाशी : आरोपी नामे-1) अमोल विठ्ठल गवळी, वय 35वर्षे, रा. सरमकुंडी ता. वाशी जि. धाराशिव, हे दि.28.12.2023 रोजी 19.00 वा. सु. आपल्या ताब्यातील स्कुटी क्र एमएच 25 एटी 3514 ही सरमकुंडी फाटा ते मुख्य चौकात मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द वाशी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.