परंडा : परंडा येथे अवैधरित्या गोवंशीय जनावरांची कत्तल चालू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरुन परंडा पोलीस ठाण्याचे पथक पोउपनि श्री. घोंगडे, पोलीस हवालदार- शेख, पायाळ, पोलीस नाईक गुंडाळे, यादव, आडसुळ, यांनी दि. 17.03.2024 रोजी 05.45 वा. सु. कत्तल खान्यावर छापा टाकला. छाप्या दरम्यान दर्गा रोड कुरेशी गल्ली परंडा येथील कत्तल खान्यात गोवंशीय जनावरांचे अंदाजे 1,40,000 ₹ किंमतीचे 700 कि.ग्रॅ. मांस व लोखंडी धारदार सत्तुर बाळगलेले मिळुन आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद दोन अज्ञात व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम 5 (क), 9 (अ) अन्वये परंडा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
भूम आणि नळदुर्गमध्ये चोरी
भुम :फिर्यादी नामे-किसन भानुदास जगदाळे, वय 58 वर्षे, रा. हिवरा, ता. भुम जि. धाराशिव यांचे राहाते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 16.03.2024 रोजी 23.00 ते दि. 17.03.2024 रोजी 06.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन कपाटातील 24 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम 20,000₹ तसेच साक्षीदार यांचे घरातील रोख रक्कम 15,000₹ व 5 ग्रॅम वजनचे दागिने असा एकुण 1,85,017 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- किसन जगदाळे यांनी दि.17.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो. ठाणे येथे 457, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग :फिर्यादी नामे-धनाजी मनोहर पात्रे, वय 54 वर्षे, रा. आरळी खु, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे अंदाजे 23,000₹ किंमतीचे एक बोकड व एक शेळी हे दि. 15.03.2024 रोजी 21.30 ते दि. 16.03.2024 रोजी 03.00 वा. सु. आरळी खु. येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- धनाजी पात्रे यांनी दि.17.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.