ढोकी : मयत नामे- प्रताप बाबुराव सुतार, वय45वर्षे, रा. कोंड ता. जि. धारशिव हे दि.05.03.2024 रोजी दुपारी 10.30 वा. सु. जागजी ते सुभा जाणऱ्या रोडवरुन मोटरसायकल क्र एमएच 24 एएल 8296 वरुन जात होते. दरम्यान टिपर चालकाने त्याचे ताब्यातील टिपर हे हायगई व निष्काळजीपणे चालवून प्रताप सुतार यांचे मोटरसायकलला धडक दिली. या अपघातात प्रताप सुतार हे गंभीर जखमी होवून मयत झाले. टिपर चालक हा जखमीस दवाखान्यात घेवून न जात पसार झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- बाबुराव शहाजी सुतार, वय 70 वर्षे, रा. कोंड ता. जि. धाराशिव यांनी दि.17.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम-279, 304(अ) सह 134 (अ) (ब) 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मुरुम : मयत नामे- ईस्माईल मुबारक शेख, वय 29 वर्षे, रा. गुंजोटी ता. उमरगा जि. धारशिव व सोबत त्यांचे नातेवाईक नामे- हज्जोद्दीन अलिशेर जमादार हे दोघे दि. 16.03.2024 रोजी दुपारी 18.10 वा. सु. सालेगाव ते मुरुममोड मोटरसायकल क्र एमएच 12 सीएल 2067 वरुन जात होते. दरम्यान कोराळ शिवारात गणपती कुभांर यांचे शेताजवळ रोडवर हायवा टिपर क्र केए 33 बी 4647 चा चालकाने त्याचे ताब्यातील हायवा टिपर हे हायगई व निष्काळजीपणे चालवून अचानक ब्रेक मारल्याने ईस्माईल शेख यांची मोटरसायकलला हायवा टिप्प्रला पाठीमागून धडकल्याने अपघात होवून ईस्माईल शेच हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तर हज्जोद्दीन जमादार हे गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- ताहेर मकबुल सय्यद, वय 41 वर्षे, रा. गुंजोटी ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.17.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम-279, 338, 304(अ) सह 134 (अ) (ब) 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मारहाण
मुरुम :आरोपी नामे-1)महेश व्यंकटसिंग राजपूत, 2) व्ंयकटसिंग शिवसिंग राजपूत, 3) मनोज व्यंकटसिंग राजपूर, 4) गोविंद शिवसिंग राजपूत, 5) गणेश गोविंदसिंग राजपूत सर्व रा. मुरुम ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि. 14.03.2024 रोजी 19.00 वा. सु. आचार्य तांडा जाणारे रोडवर फिर्यादी नामे- विकास गणपत चव्हाण, वय 28 वर्षे, रा. आचार्य तांडा ता. उमरगा जि. धाराशिव यांना सामाईक बांधाच्या कारणावरुन झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, हंटर व दगडाने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी विकास चव्हाण यांनी दि.17.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो. ठाणे येथे 143, 147, 148, 149, 324, 323, 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.