धाराशिव :फिर्यादी नामे- लता दिपक चौधरी, वय 39 वर्ष, रा. संभाजीनगर धाराशिव ता. जि. धाराशिव या दि.14.03.2024 रोजी 20.45 वा. सु. संभाजीनगर धाराशिव येथील स्वामी समर्थ मंदीराकडे आरतीसाठी जात होत्या दरम्यान एक अनोळखी इसमाने मोटरसायकलवर समोरुन येवून लता चौधरी यांचे गळ्यातील 13 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण अंदाजे 45,000 ₹ किंमतीचे जबरीने लुटून पसार झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- लता चौधरी यांनी दि.16.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे 392 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
बेंबळी :फिर्यादी नामे-संदीप प्रदिप इंगळे, वय 36 वर्षे, रा. राजुरी ता.जि. धाराशिव यांचे राहाते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 15.03.2024 रोजी 12.30 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन कपाटातील 50 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकुण 1,10,000₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- संदीप इंगळे यांनी दि.16.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो. ठाणे येथे 454, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव :फिर्यादी नामे-रंगनाथ विनायक शिंदे, वय 47 वर्षे, रा. शिंगोली ता.जि. धाराशिव यांचे शिंगोली शिवारतील शेतातील बोरमधील तीस फुट केबल वायर अंदाजे 3,500₹ किंमतीची, तसेच आकाश नानासाहेब शिंदे यांचे बोरमधील 100 फुट अंदाजे 11,000₹ किंमतीची असा एकुण 14,500₹ किंमतीची वायर अज्ञात व्यक्तीने दि. 15.03.2024 रोजी 22.00 ते दि. 16.03.2024 रोजी 08.00 वा. सु. चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- रंगनाथ शिंदे यांनी दि.16.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग : फिर्यादी नामे- राहुल विजय चव्हाण, वय 26 वर्षे, रा. मुर्टा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे मुर्टा येथील घराजवळील उघडे तारेच्या कंपाउंडची तार कट करुन अज्ञात व्यक्तीने एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ कार मध्ये 4 बकरे, 2 शेळ्या, 1 लहान पाट असा एकुण 47, 000 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- राहुल चव्हाण यांनी दि.16.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा :दि. 15.03.2024 रोजी 01.55 वा. सु. माडज ता. उमरगा येथील बॅक ऑफ इंडिया शाखा चे बाजूस बिल्डींग मधील एटीएम अज्ञात व्यक्तीने फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करुन एटीएम चे कॅमेऱ्यावर स्प्रे मारुन अलार्मचे वायर तोडून 5 कॅमेऱ्याचे अंदाजे 50,000 ₹ चे नुकसान केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- राजेशकुमार परोही सिंह, वय 43 वर्षे, रा. मांट पोस्ट चंडराव ता. सहजनवा जि. गोरखपूर उत्तर प्रदेश ह.मु. सिव्हील हॉस्पीटल जवळ उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.16.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे 380, 511, 427 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मारहाण
बेंबळी :आरोपी नामे-1)छोट्या उर्फ विराज राजुभाउ दळवी, वय 22 वर्षे, रा. कामेगाव ता. जि. धाराशिव यांनी दि.14.03.2024 रोजी 11.30 वा. सु. तेरणा नदीत मारोती मंदीराचे पाठीमागे बंधाऱ्याजवळ असलेल्या खड्ड्यातील पाण्यात कामेगाव शिवार येथे फिर्यादी नामे- मंगल भारत मुंढे, वय 65 वर्षे, रा. कामेगाव ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने पाण्यात ढकलुन देवून मारण्याचा प्रयत्न केला. अशा मजकुराच्या फिर्यादी मंगल मुंढे यांनी दि.16.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो. ठाणे येथे 307 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.