धाराशिव – एस.टी. बसमध्ये शाळकरी अल्पवयीन मुलीचा वाईट उद्धेशाने स्पर्श करून विनयभंग केल्याप्रकरणी नळदुर्ग येथील एका आरोपीस तीन वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. हा निकाल धाराशिव जिल्हा न्यायालयाच्या प्रमुख जिल्हा न्यायाधीश अंजु शेंडे यांनी दिला.
४ फेब्रुवारी २०२१ रोजी ही घटना घडली होती. मैनोद्दीन अहेमदअली काझी ( रा. नळदुर्ग ) या आरोपीने एस.टी. बसमध्ये एका शाळकरी अल्पवयीन मुलीचा वाईट उद्धेशाने स्पर्श करून विनयभंग केला होता. याप्रकरणी नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून, न्यायालयात दोषारोपपत्र पाठवण्यात आले होते. याप्रकरणी १० साक्षीदार तपासण्यात आले होते.