धाराशिव – जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सन २०२२ चा उर्वरित पीक विमा दि. २९ जानेवारीच्या आत वाटप करण्याचे निर्देश असताना, केंद्र सरकारच्या भारतीय विमा कंपनीने आतापर्यंत २९४ कोटी पैकी केवळ ३९ कोटी रुपये वाटप केले आहेत..दरम्यान , काही राजकीय नेते विमा कंपनीची बाजू घेऊन दिशाभूल करणारी माहिती देत असल्याने शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत.
ख्ररीप २०२२ हंगाममध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीन पूर्णपणे वाहून गेले होते, काही ठिकाणी अनेक दिवस पाण्यात राहिल्याने शेतकऱ्यांना पीक विमा देणे बंधनकारक असताना, केंद्र सरकारच्या भारतीय विमा कंपनीने निम्मीच रक्कम वाटप करून शेतकऱ्यांच्या हातात वाटाण्याच्या अक्षता दिल्या होत्या. याप्रकरणी अनिल जगताप यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडली असता, जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी उर्वरित पीक विमा दि. २९ जानेवारीच्या आत वाटप करण्याचे निर्देश दिले होते.
परंतु कंपनीने आतापर्यंत २९४ कोटी पैकी केवळ ३९ कोटी रुपये वाटप केले आहेत. आठवड्याला केवळ ५० कोटी रुपये देण्याचे कंपनीने कबूल केले असून, त्यामुळे सर्व पात्रधारक शेतकऱ्यांना विमा मिळण्यास किमान दीड महिना लागणार आहे.
अनिल जगताप यांनी दिलेली माहिती
✅ खरीप पिक विमा 2022.. आज दिनांक 31 जानेवारी पर्यंत केवळ 39 कोटी रकमेचे वाटप. उर्वरित 193 कोटी रुपये रक्कम प्रोसेस मध्ये आहे.
✅ खरीप 2022 चे 232 कोटी रुपयांचे वाटप करायचे आहे मात्र नॅशनल पोर्टलवरून पैसे पडत असल्याने अत्यंत संत गतीने शेतकऱ्यांना वितरण चालू आहे कोणीही विचलित होऊ नये.
✅ काही जणांनी वर्तमानपत्रातून 206 कोटी रुपये वाटप झाले असून केवळ 26 कोटी रुपये वाटप बाकी आहे अशी दिशाभूल करणारी माहिती दिली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता सुरू आहे.
✅ यासंदर्भात भारतीय कृषी विमा कंपनीच्या राज्यस्तरीय कार्यालयाशी व कृषी विभाग धाराशिव यांच्याशी बोलणे झाले असून सविस्तर माहिती घेतली आहे.
✅ संपूर्ण रक्कम वितरित व्हायला किमान पंधरा दिवस लागतील त्यामुळे शेतकऱ्यांनी निश्चिंत राहावे.
✅ अगदी शेवटच्या शेतकऱ्याला पैसे मिळेपर्यंत आपले प्रयत्न चालू राहतील.
✅ सहा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना 50 कोटी रुपये मिळवण्यासाठी राज्य शासनाकडे प्रयत्न सुरू आहेत.
राजकीय नेत्यांना कमिशन …
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सन २०२२ चा उर्वरित पीक विमा दि. २९ जानेवारीच्या आत वाटप करण्याचे निर्देश असताना, केंद्र सरकारच्या भारतीय विमा कंपनीने आतापर्यंत २९४ कोटी पैकी केवळ ३९ कोटी रुपये वाटप केले आहेत..दरम्यान , काही राजकीय नेते विमा कंपनीची बाजू घेऊन दिशाभूल करणारी माहिती देत असल्याने शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत. या राजकीय नेत्यांना विमा कंपनीकडून कमिशन मिळाले की काय ? अशी शंका शेतकरी व्यक्त करीत आहेत.