नळदुर्ग :आरोपी नामे-1)शहनवाज जमाल सय्यद, 2) नजमा शहनवाज सय्यद, दोघे रा. नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 02.02.2024 रोजी 13.30 वा. सु. नळदुर्ग येथे फिर्यादी नामे- अल्फीया अब्दुल सत्तार शेख, वय 22 वर्षे, रा. बौध्द नगर नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव ह.मु. बाबाजान चौक पुणे स्टेशन पुणे यांना नमुद आरोपींनी हे घर आमचे आहे तुम्ही येथे यायचे नाही असे म्हणून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, चाकुने हातावर मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादीची आजी बेगम यांनाही नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लोखंडी पट्टीने हातावर मारुन जखमी केले. तसेच फिर्यादीचा मोबाईल फोन फोडून नुकसान करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अल्फीया शेख यांनी दि.04.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506,427 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग :आरोपी नामे-1) जहीरोद्दीन हनीफ शेख, 2) अन्सर जहीरोद्दीन शेख, 3) मोहोद्दीन जहीरोद्दीन शेख , 4) ताजोद्दीन जहीरोद्दीन शेख सर्व रा. मानेवाडी ता तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 02.02.2024 रोजी 20.30 वा. सु. मानेवाडी येथे फिर्यादी नामे- सुरेखा कुंडलिक हाके, वय 29 वर्षे, रा लक्ष्मण आनंदा मदने, वय 35 वर्षे, रा. मानेवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे पती कुंडलिक व दिर अनिल यांना नमुद आरोपींनी मोटार सायकलचा गाडीला धक्का लागण्याच्या कारणावरून जिवे ठार मारण्याचे उद्देशाने शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, चाकुने पोटात वार करुन गंभीर जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सुरेखा हाके यांनी दि.03.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे कलम 307, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा :आरोपी नामे-1)बाळु माळी, 2) गुरु तेली, 3) स्वप्नील माळी, 4) शंकर माने व इतर दोन इसम सर्व रा. उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.02.02.2024 रोजी सायंकाळी 11.45 वा. सु. गणेश उर्फी शेजारी उमरगा माडज पाटी जवळ कोरेगाव ते माडज गावचे मध्ये एका शेतात फिर्यादी नामे- अजित बाबुराव पाटील, वय 54 वर्षे, रा. डिग्गी ता. उमरगा जि. धाराशिव ह.मु. रामनगर पतंगे रोड उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव यांना घेवून जावून नमुद आरोपींनी तु बाळु माळी यांचे बायकोला का बोलतोस या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, चाकु व कातडी बेल्टने मारहाण करुन जखमी केले. व तु जर पोलीस स्टेशनला गेलास तर तुला जिवे ठार मारु अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अजित पाटील यांनी दि.04.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे कलम 365, 143, 147, 148, 149, 324, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.