• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, October 7, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

निष्काळजीपणे गॅस शेगडी पेटवणाऱ्या हॉटेल्स व हातगाडी चालकांवर पोलिसांची धडक कारवाई; कळंब व परंड्यात ५ गुन्हे दाखल

admin by admin
August 20, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – सार्वजनिक ठिकाणी सुरक्षिततेचे नियम धाब्यावर बसवून निष्काळजीपणे गॅस शेगडी पेटवून लोकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या हॉटेल व हातगाडी चालकांवर धाराशिव पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. कळंब आणि परंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या तपासणीत एकूण ५ जणांविरोधात स्वतंत्र गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

१) कळंब पोलिसांची मस्सा (खं.) येथे कारवाई

कळंब पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मस्सा खंडेश्वरी गावात जाणाऱ्या रस्त्यालगत सुरेश गोपीलाल शर्मा (वय ३८ वर्षे, रा. मस्सा खं., ता. कळंब) हा आपल्या हातगाडीवर कोणतीही सुरक्षितता न बाळगता निष्काळजीपणे गॅस शेगडी पेटवून व्यवसाय करत असल्याचे १९ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ८.१५ वाजेच्या सुमारास पोलिसांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी पोलिसांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून सुरेश शर्मा याच्याविरुद्ध कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

२) परंडा पोलिसांची माणकेश्वर येथे ४ हॉटेल्सवर कारवाई

परंडा पोलीस ठाण्याच्या पथकाने १९ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२.१५ ते सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास माणकेश्वर परिसरातील हॉटेल्सची तपासणी केली. यावेळी मानवी जीवितास धोका निर्माण होईल अशा रीतीने गॅस शेगडीचा वापर केल्याप्रकरणी खालील ४ जणांवर स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले:

  • हॉटेल राजगड : आकाश अभिमान चव्हाण (वय ३२ वर्षे, रा. माणकेश्वर, ता. भूम).

  • हॉटेल समर्थ : पांडुरंग शिवाजीराव बोराडे (वय ३८ वर्षे, रा. सावरगाव, ता. भूम).

  • हॉटेल माउली : शशीकांत लहु मोराळे (वय ३५ वर्षे, रा. तांबेवाडी, ता. भूम).

  • हॉटेल भोलेश्वर कॅन्टीन : सागर लक्ष्मण बोराडे (वय ३२ वर्षे, रा. सावरगाव, ता. भूम).

गुन्हे दाखल

सार्वजनिक व वर्दळीच्या ठिकाणी अग्नी किंवा ज्वलनशील पदार्थांचा निष्काळजीपणे वापर केल्याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांत आरोपींविरोधात गुन्हे नोंदवण्यात आले असून, पोलीस या प्रकरणांचा पुढील तपास करत आहेत.

Previous Post

धाराशिव : ज्येष्ठ नागरिकाच्या कॅनरा बँक खात्यातून ऑनलाइन १ लाख रुपये लंपास; सायबर पोलिसांत गुन्हा दाखल

Next Post

रस्त्यावर बेशिस्त व धोकादायक वाहन पार्किंग करणाऱ्यांवर पोलिसांचा मोठा बडगा; ६ पोलीस ठाण्यांत १२ वाहनचालकांवर गुन्हे दाखल

Next Post
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

रस्त्यावर बेशिस्त व धोकादायक वाहन पार्किंग करणाऱ्यांवर पोलिसांचा मोठा बडगा; ६ पोलीस ठाण्यांत १२ वाहनचालकांवर गुन्हे दाखल

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे १२ ग्रॅम सोने लंपास

October 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

कळंब तहसीलचे बनावट शिक्के मारून कोर्टात सादर केली खोटी संचिका; न्यायालयाची व शासनाची फसवणूक करणाऱ्या तेरखेडा येथील इसमावर गुन्हा दाखल

October 6, 2026
पवनचक्कीच्या तारा चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; भंगार खरेदीदारासह ६ जणांना अटक, साडेअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त

पवनचक्कीच्या तारा चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; भंगार खरेदीदारासह ६ जणांना अटक, साडेअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त

October 6, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

धाराशिवमध्ये गोवंशाची दाटीवाटीने वाहतूक; चार वाहनांसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

October 5, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या चार घटना; विद्युत तार, ट्रान्सफॉर्मर साहित्य अन् दुचाकी लंपास

October 5, 2026

Recent Posts

  • धाराशिव बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे १२ ग्रॅम सोने लंपास
  • कळंब तहसीलचे बनावट शिक्के मारून कोर्टात सादर केली खोटी संचिका; न्यायालयाची व शासनाची फसवणूक करणाऱ्या तेरखेडा येथील इसमावर गुन्हा दाखल
  • पवनचक्कीच्या तारा चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; भंगार खरेदीदारासह ६ जणांना अटक, साडेअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त
  • धाराशिवमध्ये गोवंशाची दाटीवाटीने वाहतूक; चार वाहनांसह लाखोंचा मुद्देमाल जप्त
  • धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या चार घटना; विद्युत तार, ट्रान्सफॉर्मर साहित्य अन् दुचाकी लंपास
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!