तुळजापूर :आरोपी नामे-1)श्वेता बाळासाहेब पवार, 2) जया बाळासाहेब पवार, 3) बाळासाहेब पवार, 4) प्रेम बाळासाहेब पवार, 5) अभिषेक बाळासाहेब पवार, 6) आरती पवार, 7) शुभम फंड सर्व रा. वडार वस्ती बुधवार पेठ सोलापूर ता.जि. धाराशिव यांनी दि. 29.02.2024 रोजी 10.00 वा. सु. सिंदफळ येथे फिर्यादी नामे- शालन शाहिर मिसाळ, वय 47 वर्षे, रा. सिंदफळ ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नुकसान भरपाई देण्याचे कारणावरुन नमुद आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादीचे पती शाहिर मिसाळ हे भांडण सोडवण्यास आला असता नमुद आरोपींनी त्यासही शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे शालन मिसाळ यांनी दि.29.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे कलम 452, 323, 327,504, 506, 294, 143, 147, 149 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव :आरोपी नामे-1) शारुख पठाण, 2) कादर शेख, 3) शशिकांत गायकवाड यांनी दि. 27.02.2024 रोजी 09.00 वा. सु. शाळेजवळील मुनेर शेख यांच्या टपरी समोर फिर्यादी नामे- समीर लतीफ शेख, वय 26 वर्षे रा. आंबेहोळ ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी वरातीचा बॅड का बंद केला या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, बांबूचा काठीने डोक्यात मारहाण करुन जखमी केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे समीर शेख यांनी दि.29.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे कलम 324, 323,504, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
परंडा :आरोपी नामे-1) शिवाजी निवृत्ती नरुटे, 2) महादेव निवृत्ती नरुटे दोघे रा. आवारपिंप्री ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि. 29.02.2024 रोजी 12.30 वा. सु. आवारपिंप्री शिवार शेत गट नं 2 मध्ये फिर्यादी नामे- रेवननाथ वामन नरुटे, वय 60 वर्षे, रा. आवारपिंप्री ता. परंडा जि. धाराशिव यांना व त्यांची पत्नी उषाबाई यांना रस्त्याच्या कारणावरुन नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगड मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे रेवननाथ नरुटे यांनी दि.29.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे कलम 324, 323,504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.