शिराढोण : मयत नामे- झुंबर मच्छिंद्र ओव्हाळ, 2) भाउसाहेब उत्तमराव गांधले, रा. कडकनाथवाडी, ता. वाशी जि. धाराशिव हे दोघे दि 11.11.2023 रोजी 17.00 वा. सु. घारगावाचे अलीकडे व्यंकट आबाराव साळुंके यांचे शेताजवळुन मोटरसायकल क्र एमएच 23 व्ही 2990 वरुन जात होते. दरम्यान मोटरसायकल क्र एमएच 25 एवाय 1630 च्या चालक आरोपी नामे- महादेव लक्ष्मण गिरी, रा. वाकडी, ता. कळंब जि.धाराशिव यांनी त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चुकीच्या दिशेने चालवून झुंबर ओव्हाळ यांचे मोटरसायकलला समोरुन धडक दिली. या अपघातात झुंबर ओव्हाळ, भाउसाहेब गांधले व आरोपी नामे- महादेव लक्ष्मण गिरी हे तिघे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी आदेश झुंबर ओव्हाळ, वय 27 वर्षे, रा. कडकनाथवाडी ता. वाशी, जि. धाराशिव ह.मु. महसुल कॉलनी कळंब ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.15.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग : मयत नामे- शंकरराव विठ्ठल इटकळे, वय 48 वर्षे, रा. अरबळी ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि 13.11.2023 रोजी 09.00 वा. सु. धनगर वाडीपाटीचे जवळ महादेव घोडके यांचे शेताजवळून लूना मोटरसायकल क्र एमएच 25 एयु 3309 ही वरुन जात होते. दरम्यान कार क्र एमएच 01 बी बी 8235 चा चालक आरोपी नामे- रोहीदास अशोक वाघमारे, रा. तावशीगड ता. लोहारा जि.धाराशिव ह.मु. सर्वे नं 660/2 राजीव गांधी नगर प्रियदर्शनी चाळ जवळ बीबवेवाडी पुणे यांनी त्याचे ताब्यातील कार ही हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवून शंकरराव विठ्ठल इटकळे यांचे लूना मोटरसायकलला पाठीमागून धडक दिली. या आपघातात शंकरराव इटकळे हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी सिध्दाराम अशोक इटकळे, वय 35 वर्षे, रा. केरुर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.15.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.