आंबी :आरोपी नामे- 1)भैरु विठ्ठल शिंदे, रा. मलकापूर ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि.14.11.2023 रोजी 14.30 वा. सु. मलकापूर येथे फिर्यादी नामे- शिवाजी धोंडीबा शिंदे, वय 48 वर्षे, रा. मलकापूर ता. परंडा जि. धाराशिव यांना कौटुंबिक वादाचे कारणावरुन नमुद आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- शिवाजी शिंदे यांनी दि.15.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आंबी पो. ठाणे येथे कलम 324, 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा :आरोपी नामे- 1)शिवाजी सितराम सरवदे, 2) बब्रुवान सिताराम सरवदे, 3) आदेश बब्रुवान सरवदे, 4) करण बब्रबवान सरवदे सर्व रा. बलसुर ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.11.11.2023 बलसुर येथे फिर्यादी नामे- सुभाष सिताराम सरवदे, वय 45 वर्षे, रा. बलसुर, ता. उमरगा जि. धाराशिव यांना आर्थिक व्यवहाराचे कारणावरुन व शेतीच्या वादातुन नमुद आरोपीनी फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, विळ्याने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- सुभाष सरवदे यांनी दि.15.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
प्राण्यांना निर्दयपणे वागणूक देणाऱ्यावर गुन्हा दाखल
उमरगा : आरोपी नामे-अंबादास दत्तु मोरे, वय 22 वर्षे, रा. कसगी ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.15.11.2023 रोजी 20.15 वा.सु. अशोक लिलॅड टॅम्पो क्र एमएच 25 एजे 2263 मध्ये 4 खोंड व 2 गाई असे एकुण 6 जनावरे क्षमतेपेक्षा जास्त दाटीवाटीने भरुन जनावरांना चारापाण्याची अगर औषधपाण्याची सोय नसताना अरुंद जागेत दोरीने निर्दयपणे टॅम्पो मध्ये भरुन घेवून जात असतांना उमरगा पो.ठा.च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे नमूद व्यक्तींविरुध्द प्राण्यांना निर्दयपणे वागणूक कायदा कलम 11 (ढी(ई) सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा कलम- 5, 5(ए), 5(बी), 9, प्राण्याचे परिवहन अधिनियम कलम 47, 54, 56 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.