• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, October 17, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव नगर पालिका गैरव्यवहार प्रकरण : तपास डीवायएसपी राठोड यांच्याकडे वर्ग

पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर निष्क्रिय

admin by admin
November 17, 2023
in धाराशिव शहर
Reading Time: 1 min read
बोगस गुंठेवारी प्रकरणी मुख्याधिकारी वसुधा फड यांना सहआरोपी करा
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – धाराशिव नगर पालिकेतील कथित २७ कोटीच्या गैरव्यवहार प्रकरणी दोन आरोपीना अटक करण्यात आनंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर शेवटपर्यत निष्क्रिय ठरले. धाराशिव लाइव्हच्या दणक्यानंतर हा प्रकरणाचा तपास बांगर यांच्याकडून काढून डीवायएसपी स्वप्नील राठोड यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

धाराशिव नगर पालिकेतील कथित २७ कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी तत्कालीन निलंबित मुख्याधिकारी हरिकल्याण जनार्धन येलगट्टे यांच्यासह तीन जणांवर आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये १४ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी येलगट्टे यांना पोलिसांनी अटक केली असली तरी बोर्डे आणि पवार तीन महिन्यापासून मोकाट आहेत. आरोपी आणि पोलीस यांच्यात ‘अर्थपूर्ण’ बोलणी झाल्याने आनंदनगर पोलीस आरोपीना अटक करण्याचे धाडस करीत नव्हते. याप्रकरणी धाराशिव लाइव्हने सातत्याने बातम्या दिल्या होत्या.

धाराशिव नगर पालिकेतील कथित २७ कोटीच्या गैरप्रकरणी आनंदनगर पोलीस निष्क्रिय ठरल्याने हे प्रकरण वरिष्ठ अधिकाऱ्याकडे वर्ग करून आरोपींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी आ. सुरेश धस यांनी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली होती. अखेर या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी बांगर यांच्याकडुन काढून पोलीस उपअधीक्षक स्वप्नील राठोड यांच्याकडे सोपवला आहे.

धाराशिव नगर पालिकेतील कथित २७ कोटीच्या गैरव्यवहार प्रकरणी तपास डीवायएसपी स्वप्नील राठोड यांच्याकडे सोपवण्याचे पत्र पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी २० ऑक्टोबर रोजी दिले होते, पण बांगर यांनी डीवायएसपी स्वप्नील राठोड यांच्याकडे फाईल देण्यास जवळपास एक महिना लावला. यावरून बांगर यांनी पालिका गैरव्यवहार प्रकरणी वाहत्या पाण्यात हात धुवून घेतल्याचे स्पष्ट आहे.

काय आहे प्रकरण ?

आरोपी नामे- हरिकल्याण जनार्धन येलगट्टे, तत्कालीन मुख्याधिकारी, नगर परिषद उस्मानाबाद 2) सुरज संपत बोर्डे तत्कालीन लेखापाल, 3) प्रशांत विक्रम पवार तत्कालीन अंतर्गत लेखापरिक्षक सर्व रा. उस्मानाबाद यांनी दि.06.07.2020 ते दि.21.11.2022 पावेतो नगर परिषद उस्मानाबाद येथे एकुण 1088 प्रमाणके शासकीय अभिलेख आहे. हे माहित असताना व ते लेखाविभागात जतन करुन ठेवणे बंधनकारक असताना ती ठेवली नाहीत आणिक विविध विकास योजना व इतर आनुषंगीक खर्चाबाबतचे एकुण 514 प्रमाणके ज्याची एकुण 27,38,78,100 ₹ रक्कमेचा अपहार करुन तो दडपण्याच्या उद्देशाने प्रमाणके जाणिवपुर्वक लेखाविभागात ठेवले नाहीत अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अशोक कलेश्वर फरताडे, वय 31 वर्षे, धंदा लेखापाल नगर परिषद उस्मानाबाद रा.मस्सा खंडेश्वरी ता. कळंब जि. उसृमानाबाद हा.मु. समर्थ नगर उस्मानाबाद ता. जि. उस्मानाबाद यांनी दि.14.08.2023 रोजी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 420, 409, 34, 201 सह महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधि कलम 9 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

बांगरवर कारवाई करा

धाराशिव नगर पालिकेतील कथित २७ कोटीच्या गैरव्यवहार प्रकरणी आरोपी असलेले सुरज संपत बोर्डे ( तत्कालीन लेखापाल ) प्रशांत विक्रम पवार ( तत्कालीन अंतर्गत लेखापरिक्षक ) यांना आनंदनगर पोलिसांनी जाणीवपूर्वक अटक केली नाही. याप्रकरणी मोठी डील झाल्याची चर्चा आहे. निष्क्रिय पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांच्यावर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी कोणती कारवाई करणार ? याकडे लक्ष वेधले आहे.

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात हाणामारीचे दोन गुन्हे दाखल

Next Post

प्रलंबित पिक विमा व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी ठाकरे सेनेचे धरणे आंदोलन

Next Post
प्रलंबित पिक विमा व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी ठाकरे सेनेचे धरणे आंदोलन

प्रलंबित पिक विमा व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी ठाकरे सेनेचे धरणे आंदोलन

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव जिल्ह्यात अपहरणाच्या दोन घटना; ढोकीत ५२ वर्षीय व्यक्ती तर आनंदनगरमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता

October 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : ‘आमच्याकडे रागाने का बघतोस?’ म्हणून २४ वर्षीय तरुणावर कोयता, काठी अन् बेल्टने हल्ला

October 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

खामसवाडी : प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून कॉम्प्युटर सेंटरचालकावर चाकू अन् लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला

October 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

जळकोट शिवार : शेतीच्या वादातून रक्तरंजित थरार; चाकू व दगडाने प्राणघातक हल्ला करून तरुणाला केले गंभीर जखमी

October 17, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

भंडारी शिवार : हॉटेलमध्ये नेहमी रागावल्याचा मनात धरला राग; ओडिशातून आलेल्या वेटरने डोक्यात वार करून मालकाचाच केला निर्घृण खून

October 17, 2026

Recent Posts

  • धाराशिव जिल्ह्यात अपहरणाच्या दोन घटना; ढोकीत ५२ वर्षीय व्यक्ती तर आनंदनगरमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता
  • उमरगा : ‘आमच्याकडे रागाने का बघतोस?’ म्हणून २४ वर्षीय तरुणावर कोयता, काठी अन् बेल्टने हल्ला
  • खामसवाडी : प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून कॉम्प्युटर सेंटरचालकावर चाकू अन् लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला
  • जळकोट शिवार : शेतीच्या वादातून रक्तरंजित थरार; चाकू व दगडाने प्राणघातक हल्ला करून तरुणाला केले गंभीर जखमी
  • भंडारी शिवार : हॉटेलमध्ये नेहमी रागावल्याचा मनात धरला राग; ओडिशातून आलेल्या वेटरने डोक्यात वार करून मालकाचाच केला निर्घृण खून
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!