भूम : फिर्यादी नामे- संदीप विठ्ठल सुतार, वय 39 वर्षे, रा. शासकिय विश्रामगृह शेजारी पारडी रोड ता. भुम जि. धाराशिव, यांची 1,00,000₹ किंमतीची सेव्हरलेट बीट कंपनीची सिलव्हर रंगाची डीलेज कार ही दि. 24.10.2023 रोजी 01.30 ते 03.00 वा. सु पारडी ते अहमदनगर जाणारे राजृय महामार्ग क्र 57 वर शासकिय विश्रामगृह शेजारी फिर्यादीचे घरा समोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी- संदीप सुतार यांनी दि.27.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर : फिर्यादी नामे- रत्नदिप नानासाहेब अमृतराव, वय 33 वर्षे, रा. खडकाळ गल्ली शुक्रवार पेठ तुळजापूर जि. धाराशिव, यांची 50,000₹ किंमतीची सी.बी. युनीकॉर्न कंपनीची काळ्या रंगाची मोटरसायकल क्र एमएच 25 एक्यु 1988 ही दि. 25.10.2023 रोजी 02.00 ते 06.00 वा. सु फिर्यादीचे बायपास रोड जवळील उड्डाण पुलाजवळील शेतातील शेड समोर तुळजापूर येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी- रत्नदिप अमृतराव यांनी दि.27.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : फिर्यादी नामे- महेश बाळासाहेब जाधव, वय 29 वर्षे, रा. बावी ता. जि.. धाराशिव, यांची 20,000₹ किंमतीची हिरो कंपनीची काळ्या रंगाची स्पेलंन्डर प्लस मोटरसायकल क्र एमएच 25 ए.जी. 8045 ही दि. 26.10.2023 रोजी 10.00 ते दि. 27.10.2023 रोजी 06.30 वा. सु बावी येथील फिर्यादीचे चुलत भाउ अरुण जाधव यांचे राहाते घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी- महेश जाधव यांनी दि.27.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
आंबी : फिर्यादी नामे- विलास गहिनीनाथ ठाकरे, वय 42 वर्षे, रा. देवगाव बु. ता. परंडा जि. धाराशिव, यांची 30,000₹ किंमतीची काळ्या रंगाची स्पेलंन्डर प्लस मोटरसायकल क्र एमएच 25 ए.यु. 1373 ही दि. 26.10.2023 रोजी 23.00 ते दि. 27.10.2023 रोजी 06.00 वा. सु विलास ठाकरे यांचे राहाते घरा समोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी- विलास ठाकरे यांनी दि.27.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आंबी पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
रस्ता अपघात
धाराशिव :मयत नामे-रमेश अर्जुन जाधव, वय 45 वर्षे, रा. वडगाव सिध्देश्वर ता.जि. धाराशिव हे दि. 19.10.2023 रोजी 12.30 वा. सु. धाराशिव ते सोलापूर जाणारे एन.एच. 52 हायवे रोडवर धाराशिव शहर येथे उड्डान पुलावरून रोडच्या पलीकडे पायी जात होते. दरम्यान अज्ञात वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन हे हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवून रमेश जाधव यांना पाठीमागून धडक दिली. या आपघातात रमेश जाधव हे गंभीर जखमी होवून मयत झाले. नमुद अज्ञात वाहन चालक हा अपघाताची माहिती न देता अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी सुशिल अर्जुन जाधव, वय 21 वर्षे रा. वडगाव सिध्देश्वर ता. जि. धाराशिव यांनी दि.27.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो. वा. कायदा कलम 184, 134 (अ) (ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.