वाशी : फिर्यादी नामे- योगेश ईश्वर शेजाळ, वय 21 वर्षे, रा. डोकेवाडी, ता. भुम जि. धाराशिव, यांची आजी रंजना बाबासाहेब शेजाळ या नवीन घराला कुलूप लावून जुन्या घरी गेल्या असता ढोकेवाडी येथील नवीन घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि.27.10.2023 रोजी 15.00 ते 15.30 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन घरातील लोखंडी पेटीतील 20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम 90,000₹ असा एकुण 1,20,000₹किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी- योगेश शेजाळ यांनी दि.28.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे कलम 454, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : फिर्यादी नामे- बालाजी दशरथ हराळे, वय 27 वर्षे, रा. घाटंग्री ता. जि. धाराशिव, यांचे घांटग्री जिल्हा परिषद पाझर तलाव क्र 1 मधील मासे व मरळ पकडण्यासाइी जाळे, गळाची दावण व पिंजरे टाकलेले तसेच मासे व मरळ असा एकुण 44,500 ₹ किंमतीचा माल हा दि. 27.10.2023 रोजी 00.00 ते 04.00 वा. सु. आरोपी नामे- 1) राहुल बाबु राठोड, 2) राजेंद्र राठोड, 3) धोंडीराम लिंबाजी राठोड, 4) लखन हरिश्चंद्र राठोड सर्व रा. अंबेजवळगा तांडा जि. धाराशिव आणि इतर अनोळखी 6 इसम यांनी चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी- बालाजी हराळे यांनी दि.28.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे कलम 379, 34भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर : फिर्यादी नामे-मनोज लहु साठे, वय 23 वर्षे, रा. येमाई मार्डी ता. उत्तर सोलापूर जि. सोलापूर हे दि. 28.10.2023 रोजी 07.30 वा. सु. नविन बसस्थानक तुळजापूर येथे बस मध्ये चढत असताना मनोज साठे यांचे गळ्यातील सव्वा तोळे वजनाची सोन्याची साखळी अंदाजे 31,000₹ किंमतीची अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेवून चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी- मनोज साठे यांनी दि.28.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मारहाण
वाशी :आरेापी नामे- 1) शहाजी शेषेराव कदम, 2) सिध्दांत शहाजी कदम, 3) गणेश मधुकर मगर, 4) बबन गोवर्धन कदम, 5) अशाबाई बबन कदम, 6) सुनिता शहाजी कदम सर्व रा. कन्हेरी, ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि.24.10.2023 रोजी 20.30 वा. सु. कन्हेरी गावातील मुख्य चौकात फिर्यादी नामे- उमेश बाबुराव खरात,वय 53 वर्षे, रा. कन्हेरी ता. वाशी जि. धाराशिव यांना फिर्यादीचे मुलास मोटार सायकलला कट मारण्याचे कारणावरुन नमुद आरोपीतांनी गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादीचे मुलगा अमोल खरात व पत्नीस जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, मोटार सायकलचे चैन व काठीने मारहाण करुन जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या उमेश खरात यांनी दि.28.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 143, 147, 148, 149, 324, 323, 452,504, 506 सह अ.जा.ज.अ. प्र.कायदा कलम 3(1)(आर)(एस), 3(2) (व्हिए) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.