आंबी : आरोपी नामे-1)योगेश सुरेश बैरागी, वय 27 वर्षे, रा. आनाळा ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि.22.11.2023 रोजी 18.00 वा. सु. आपल्या ताब्यातील टॅम्पो क्र एमएच 12 एफ.डी. 4131 हा आनाळा येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना आंबी पोलीसांना मिळून आला. तसेच 2)प्रज्योत बाळु शिंदे, वय 25 वर्षे, रा. देवुळगाव, ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि.22.11.2023 रोजी 18.30 वा. सु.आपल्या ताब्यातील टॅम्पो क्र एमएच 06 जी. 2144 हा आनाळा चौकात सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना आंबी पोलीसांना मिळून आला. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.द.स. कलम 283 अन्वये आंबी पो.ठा. येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
लोहारा : आरोपी नामे-1)सागर बलभिम जाधव, वय 29 वर्षे, रा. जेवळी दक्षिण, ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि.22.11.2023 रोजी 13.00 वा. सु. आपल्या ताब्यातील ॲपे रिक्षा क्र एमएच 25 ई 9738 हा जेवळी बाजार चौक येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना लोहारा पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.स. कलम 283 अन्वये लोहारा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
मुरुम : आरोपी नामे-1)संजय गाणपतराव रावळे, वय 45 वर्षे, रा. केसरजवळगा ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.22.11.2023 रोजी 17.40 वा. सु. आपल्या ताब्यातील जिप क्र एमएच 34 एफ 0939 ही अक्कलकोट ते मुरुम जाणारे रोडवर बेंळंब बसस्थानक समोर सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना मुरुम पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.स. कलम 283 अन्वये मुरुम पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
हायगई व निष्काजीपणे वाहन चालविणाऱ्यांवर गुन्हे दाखल
तामलवाडी : तुळजापूर खुर्द ता. तुळजापूर जि. धाराशिव येथील- शंकर ज्योतिलींग चव्हाण, वय 27 वर्षे यांनी दि.22.11.2023 रोजी 12.20 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल विना नंबर असलेली ही सोलापूर ते तुळजापूर जाणारे एनएच 52 रोडवर बालाजी अमाईन्स समोर रस्त्याजवळ तामलवाडी येथे सार्वजनिक रस्त्यावर लोकांच्या जिवीतास धोका निर्माण होईल अशा हयगयीने व निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवताना तामलवाडी पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.स. कलम 279 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.