• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, October 13, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवमध्ये कत्तलीचा डाव उधळला; १.८० लाखांची ११ गोवंशीय जनावरे जप्त

admin by admin
June 7, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
भूम : कत्तलीसाठी गायींची बेकायदेशीर वाहतूक; ४.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा दाखल
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव –  शहरातील देवी मंदिराच्या पाठीमागे कत्तलीच्या उद्देशाने निर्दयतेने बांधून ठेवलेल्या ११ गोवंशीय जनावरांची धाराशिव शहर पोलिसांनी सुटका केली आहे. अंदाजे १ लाख ८० हजार रुपये किमतीची ही जनावरे जप्त करण्यात आली असून, याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी, ५ जून २०२५ रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास देवी मंदिराच्या मागील मोकळ्या जागेत काही जनावरे बेकायदेशीररित्या कत्तलीसाठी बांधून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला असता, त्या ठिकाणी ११ गायी, कालवडी आणि खोंड चारा-पाण्याची व्यवस्था न करता निर्दयपणे बांधलेल्या अवस्थेत आढळून आले.

याप्रकरणी पोलिसांनी सरकारतर्फे फिर्याद देऊन जावेद जलील सय्यद (वय ३८, रा. ख्वाजा नगर, धाराशिव) याच्या विरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम आणि प्राण्यांना क्रूरतेने वागण्यास प्रतिबंधक अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. या कारवाईमुळे शहरात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या कत्तलखान्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास धाराशिव शहर पोलीस करत आहेत.

बेंबळी पोलिसांची कारवाई: कत्तलीसाठी होणारी बैलांची अवैध वाहतूक रोखली; एकावर गुन्हा दाखल

बेंबळी – कत्तलीच्या उद्देशाने वाहनातून बैलांची निर्दयपणे वाहतूक करणाऱ्या एका तरुणावर बेंबळी पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी उजणी टी-पॉईंट येथे वाहन अडवून सुमारे १ लाख रुपये किमतीचे चार बैल जप्त केले असून, आरोपी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, बेंबळी पोलीस शुक्रवारी, ६ जून २०२५ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी उजणी टी-पॉईंट येथे एक वाहन (क्र. एमएच १३ सीजे १३५३) संशयितरित्या जाताना दिसले. पोलिसांनी ते वाहन थांबवून तपासणी केली असता, त्यामध्ये चार बैल चारा-पाण्याची कोणतीही सोय न करता अत्यंत निर्दयीपणे कोंबून भरल्याचे आढळून आले.

पोलिसांनी तात्काळ वाहन आणि त्यातील चारही बैल जप्त केले. चौकशी केली असता वाहनचालकाचे नाव प्रसाद लहू मोरे (वय १९, रा. खेड, ता. लोहारा) असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी सरकारतर्फे फिर्याद देऊन आरोपी प्रसाद मोरे विरोधात प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंधक अधिनियमातील विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बेंबळी पोलीस करत आहेत.

Previous Post

एसटी चालकाची बतावणी करून फसवणूक, एकावर गुन्हा दाखल

Next Post

जुनोनीजवळ टमटम उलटून भीषण अपघात; महिलेचा मृत्यू, आठ जण जखमी

Next Post
काक्रंबा पाटीजवळ भीषण अपघात : टेम्पो पुलाच्या कठड्याला धडकला; चार वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू, सात जण जखमी

जुनोनीजवळ टमटम उलटून भीषण अपघात; महिलेचा मृत्यू, आठ जण जखमी

ताज्या बातम्या

 ‘कृष्णा खोऱ्या’च्या पाण्याचा थांगपत्ता नाही; ४० वर्षांच्या सत्तेनंतरही धाराशिववर ‘पाणीबाणी’ आणणारे फेसबुकी भगीरथ!

 ‘कृष्णा खोऱ्या’च्या पाण्याचा थांगपत्ता नाही; ४० वर्षांच्या सत्तेनंतरही धाराशिववर ‘पाणीबाणी’ आणणारे फेसबुकी भगीरथ!

October 13, 2026
कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

परंडा तालुक्यात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 13, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या सहा घटना; जनावरे, टायर, केबलसह लोखंडी साहित्य लंपास

October 13, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापुरात विषारी ताडीच्या नशेत दोघा तरुणांचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांवर मारहाणीचा आरोप, शहरात तणाव

October 13, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

धाराशिव : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार; पीडितेने दिला बाळाला जन्म

October 12, 2026

Recent Posts

  •  ‘कृष्णा खोऱ्या’च्या पाण्याचा थांगपत्ता नाही; ४० वर्षांच्या सत्तेनंतरही धाराशिववर ‘पाणीबाणी’ आणणारे फेसबुकी भगीरथ!
  • परंडा तालुक्यात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
  • धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या सहा घटना; जनावरे, टायर, केबलसह लोखंडी साहित्य लंपास
  • तुळजापुरात विषारी ताडीच्या नशेत दोघा तरुणांचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांवर मारहाणीचा आरोप, शहरात तणाव
  • धाराशिव : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार; पीडितेने दिला बाळाला जन्म
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!