शिराढोण : फिर्यादी नामे-राजाभाउ रामराव जायभाय, रा. ढोराळा ता. कळंब जि. धाराशिव यांचे ढोराळा शिवारातील शेत गट नं 452 मधील पत्र्याचे शेड मधील अंदाजे 60,000 ₹ किंमतीच्या दोन काळ्या पांढऱ्या रंगाच्या जर्सी गाय व एक वासरु हे दि.23.12.2023 रोजी 00.10 ते 06.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे-राजाभाउ जायभाय यांनी दि.23.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : फिर्यादी नामे-मुखत दिरखान मुखतार खान पठाण, वय 75 वर्षे, रा. पठाण गल्ली दर्गा रोड धाराशिव ता. जि. धाराशिव यांची अंदाजे 36,000₹ किंमतीची टी.व्ही. एस. ज्युपीटर गाडी क्र एमएच 25 ए.एम 0030 ही दि. 22.12.2023 रोजी रात्री 01.30 ते 07.30 वा. सु. पठाण गल्ली दर्गा रोड धाराशिव येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे-मुखत दिरखान पठाण यांनी दि.23.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मारहाण
परंडा :आरोपी नामे- 1)विकास नागटिळक, खासापुरी सज्जाचे तलाठी ह.मु. समर्थ नगर परंडा ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि.20.12.2023 रोजी 11.30 वा .सु. तलाठी कार्यालय समर्थ नगर परंडा येथे फिर्यादी नामे-योगेश परमेश्वर मेटकरी, वय 27 वर्षे, रा. संगमपार्क परंडा ता. परंडा जि. धाराशिव, यांना नमुद आरोपींनी उल्पा नदीतुन मोठया प्रमाणावर वाळू उपसा व वाहतुक होत असलेबाबत तक्रार करण्याकरीता गेल्याचे कारणावरुन नमुद आरोपीने शिवीगाळ करुन टेबलवरील कुलुप डोक्यात मारुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- योगेश मेटकरी यांनी दि.23.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे कलम 324, 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.