ढोकी : धाराशिव तालुक्यातील तावरजखेडा ग्रामपंचायतीमध्ये साडेआठ लाखाचा अपहार केल्याप्रकरणी महिला सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवकविरुद्ध ढोकी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी नामे- 1)मनिषा दिगंबर फेरे, वय, 36 वर्षे, (सरपंच), रा. तावरजखेडा,ता. जि. धाराशिव 2) विजय नारायण चित्ते, वय 52 वर्षे, व्यावसा-(ग्रामसेवक), रा. पंचायत समिती कार्यालय धाराशिव, ता. जि. धाराशिव 3) तुकाराम नानासाहेब फेरे, वय 48 वर्षे, (उपसरपंच), रा. तावरजखेडा ता. जि. धाराशिव यांनी दि.18.08.2022 रोजी पासून ते दि. 16.01.2023 रोजी पर्यंत वेळोवेळी तावरजखेडा ता. जि. धाराशिव गावाला पाणीपुरवठा व इतर सोयी देण्यासाठी आराखडा तयार करुन त्यामध्ये दोन विंधन खोदाई विहीर, पाण्याचे पाईप, लोखंडी पाईप, बोरमध्ये मोटारी, घेतल्या असल्याचे दर्शवून शासकीय रक्कम 8,84,550 ₹ उचलून काम केल्याचे दर्शवून कागदोपत्री रेकॉर्ड तयार करुन स्वत:चे फायद्यासाठी सदर रक्कम उचलून शासकीय रक्कमेचा अपहार करुन शासनाची फसवणुक केली. असा मा. कोर्टाने कलम 156(3) सी. आर. पी. सी प्रमाणे आदेश केल्यावरुन फिर्यादी- समाधान केशव फेरे, वय 32 वर्षे, रा. तावरजखेडा ता. जि. धाराशिव यांनी दि.18.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे कलम 166, 406, 409, 420, 467, 468, 471, 34 भा.दं.वि.सं.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
सराफ दुकानात चोरी
धाराशिव : फिर्यादी नामे-सुदाम राजाराम खाडे, वय 51 वर्षे रा. बार्शी नाका शिक्षक कॉलनी धाराशिव ता. जि. धाराशिव यांचे एस. आर. खाडे ज्वेलर्स गवळी गल्ली सराफ लाईन ता. जि. धाराशिव या दुकानत काम करणारा विश्वजीत सुरवसे यांनी बुरखा घालून आलेल्या अनोळखी दोन महिलांनी त्यांना स्टॅच्युला घातलेला सोन्याचा राणी हार डिझाईन आवडला आहे तो दाखवा असे म्हणाल्याने कामगार यांने स्टॅच्युचा हार त्या दोन अनोळखी बुरखा धारी महिलांना दाखवला असता नमुद अनोळखी दोन महिलांनी विश्वजीत सुरवसे यांना यातील आणखी दुसरे कानातले गळ्यातलेचे डिझाईन दाखवा असे बोलण्यात गुंतवुन त्यातील एका महिलेने त्यातील 33 ग्रॅम वजनाचे सोन्याचा राणी हार टेम्पल असलेला किंमत अंदाजे 2,25,000 ₹ किंमतीचा चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सुदाम खाडे यांनी दि.18.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे कलम 379, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.