नळदुर्ग : आरोपी नामे- 1)रोहीत राम कदम,2) प्रकाश रामचंद्रसोनटक्के, 3) सचिन प्रकाश सोनटक्के दोघे रा. सोलापूर ता. सोलापूर, 4) प्रकाश राठोड रा. जळकोट ता. तुळजापूर जि. धाराशिव व त्यांचे सोबत अनोळखी पाच ते सहा इसम यांनी दि.11.12.2023 रोजी 09.45 वा .सु. जळकोट शिवारातील शेत गट नं 41 येथे फिर्यादी नामे-कान्होपात्रा रमेश सोनटक्के, वय 59 वर्षे, रा.जळकोट ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना व फिर्यादीचा मुलगा ओंकार रमेश सोनटक्के यास नमुद आरोपींनी जागेच्या वादाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, सतुर, रॉड व काठीने मारहण करुन जखमी केले. तसेच ओंकार यांचे गळ्यातील पाच तोळ्याची चैन तोडून व खिशातील पाच हजार रुपये घेवून गेले. अशा मजकुराच्या फिर्यादी- कान्होपात्रा सोनटक्के यांनी दि.18.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे कलम 324, 327, 143, 147, 148, 149 भा.दं.वि.सं.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
आंबी :आरोपी नामे- 1)बाबा रामभाउ खाडे, 2) सोमनाथ खाडे, 3) हनुमंत खाडे, 4) अनिता सोमनाथ खाडे, 5) वैष्णवी हनुमंत खाडे सर्व रा. सोनारी ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि. 16.12.2023 रोजी 12.00 वा. सु. सोनारी येथे फिर्यादी नामे- कोमल नवनाथ खाडे, वय 32 वर्षे, रा. सोनारी ता. परंडा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी ट्रॅक्टर घराचे समोर लावण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- कोमल खाडे यांनी दि.18.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आंबी पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 143, 147 भा.दं.वि.सं.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव :आरोपी नामे- 1)नागनाथ गोळु पवार, वय 50 वर्षे, रा. रामनगर, धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि.16.12.2023 रोजी 04.30 वा. सु. वरुडा रोड उपळा येथील शेतात फिर्यादी नामे- गितांजली संजय पवार, वय 25 वर्षे, रा. पोस्ट कॉलनी ता.जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाच्या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करत असताना फिर्यादीचे कडेवर असलेला फिर्यादीचा लहान मुलगा यास काठीचा मार लागून तो जखमी झाला. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- गितांजली पवार यांनी दि.18.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506 भा.दं.वि.सं.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मुरुम :आरोपी नामे- 1)खंडेराव अम्रत मंडले, 2) अविनाश विलास मंडले, 3) सोन्या मोहन मंडले, 4)कार्तीक कलाप्पा भोकले, सर्व रा. बेरडवाडी ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि. 18.12.2023 रोजी 18.30 वा. सु. बसस्थानक मुरुम समोर वडापाव सेंन्टरवर मुरुम ता. उमरगा जि. धाराशिव येथे फिर्यादी नामे-महेश पंडीत महानुरे, वय 22 वर्षे, रा. संभाजी नगर मुरुम ता. उमरगा जि. धाराशिव आर्थिक व्यवहाराचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, हंटरने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- महेश महानुरे यांनी दि.18.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.