धाराशिव – जिल्ह्यातील कळंब, लोहारा आणि वाशी तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यामध्ये दोन मोटारसायकली आणि एका पवनचक्कीमधील सुमारे दीड लाख रुपयांची कॉपर केबल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. या तिन्ही घटनांप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये ५ एप्रिल रोजी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
रायगव्हाण येथून मोटारसायकल चोरी:
कळंब तालुक्यातील रायगव्हाण येथील अरुण बलभिम गिराम (वय ३६ वर्षे) यांची होंडा शाईन कंपनीची, गजगा रंगाची, पासिंग नंबर नसलेली मोटारसायकल (अंदाजे किंमत ७५,००० रुपये) २९ मार्च २०२५ रोजी रात्री ९ ते ३० मार्च २०२५ रोजी पहाटे ५ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरून नेली. याप्रकरणी अरुण गिराम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिराढोण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
लोहारा येथून मोटारसायकल चोरी:
लोहारा शहरातील मणियार मोबाईल शॉपीसमोरून हमीद राजबखॉ पठाण (वय ४८ वर्षे, रा. भंडारी) यांची एमएच १३ सीसी २४२६ क्रमांकाची मोटारसायकल (अंदाजे किंमत २०,००० रुपये) २८ मार्च २०२५ रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी हमीद पठाण यांच्या फिर्यादीवरून लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
विजोरा शिवारातून कॉपर केबल चोरी:
वाशी तालुक्यातील विजोरा शिवारातील रिन्यू पॉवर कंपनीच्या १९ क्रमांकाच्या पवनचक्कीमधून अज्ञात व्यक्तीने १६२ फूट लांबीची कॉपर केबल (अंदाजे किंमत १,५१,१४० रुपये) चोरून नेली. ही घटना १६ मार्च २०२५ रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत कंपनीचे प्रतिनिधी अमोल अश्रुबा मोटे (वय ४० वर्षे, रा. गिरवली, ता. भूम) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
तिन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये चोरीचे गुन्हे दाखल केले असून, अज्ञात आरोपींचा शोध घेतला जात आहे.