तुळजापूर : मयत नामे- प्रविण सचिन निवरगी, रा.आदर्शनगर एमआयडीसी सोलापूर व जखमी नामे- अरविंद शरणप्पा काबनुर रा. आदर्शनगर एमआय डीसी सोलापूर हे दोघे दि.29.11.2023 रोजी 16.00 ते 17.00 वा. सु. तुळजापूर घाटात उतारावर रोडवरुन मोटरसायकल क्र एमएच 13 सीई 7791 ही वर बसून जात होते. दरम्यान कार क्र एमएच 31 एफ ई 5435 च्या चालकाने त्याचे ताब्यातील कार ही भरधाव वेगात, निष्काळजीपणे चुकीच्या दिशेने चालवुन जखमी नामे अरविंद काबनुर यांचे मोटरसायकलला समोरुन धडक दिली.
या अपघातात प्रविण निवरगी हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तर अरविंद काबनुर हे किरकोळ व गंभीर जखमी झाले. तसेच नमुद कार चालक हा अपघात करुन आपघाताची माहिती न देता कार सह पसार झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी- नरेंद्र शरणाप्पा काबनुर, वय 30 वर्षे, रा. निलमनगर एमआयडीसी सोलापूर ता. उत्तर सोलापूर जि. सोलापूर यांनी दि.04.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह 134 (अ) (ब)मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी : जखमी नामे- राहुल कचरु सोनवणे, 2) राखी राहुल सोनवणे, त्यांची मुलगी- मयत नामे रोहीणी राहुल सोनवणे, वय 07 वर्षे रा. हिसोरी ता.जि. लातुर हे तिघे दि.29.11.2023 रोजी 18.30 वा. सु. जागजी गावाचे जवळ रोडवरुन मोटरसायकल वर बसून जात होते. दरम्यान ट्रॅक्टर क्र एमएच 25 एएस 0858 च्या चालकाने त्याचे ताब्यातील ट्रॅक्रटरला उसाच्या लोढची विना नंबर ट्रॉली जोडून व त्या ट्रॉलीला पाठीमागील बाजूस प्रकाश परावर्तीत करणारे रिप्लेक्टर अथवा रेडीयम न लावता ट्रॅक्टर ट्रॉलीसह रोडवर उभे केल्याने यातील जखमी नामे राहुल सोनवणे यांची मोटरसायकल ट्रॉलीला पाठीमागून धडक बसून अपघात झाला. या अपघातात रोहीणी राहुल सोनवणे, वय 7 वर्षे ही गंभीर जखमी होवून मयत झाली. तर राहुल सोनवणे, राखी सोनवणे हे किरकोळ व गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या मयताचा भाउ- रोहीत कचरु सोनवणे, वय 28 वर्षे, रा. हिसोरी ता.जि. लातुर यांनी दि.04.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 283, 337, 338, 304 (अ) सह 134 (अ) (ब), 187, 104, 77 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
शासकिय कामात अडथळा करणाऱ्यावर गुन्हा दाखल
उमरगा : आरोपी नामे- 1) श्रीशैल शिवराय्या पाटील, रा. डिग्गी, ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि. 04.12.2023 रोजी 09.45 वा. सु. जिल्हा परिषद प्राथकमक शाळा डिग्गी येथील शाळेच्या वारंड्यात दारु पिवून येवून फिर्यादी नामे-श्रीमती सुनिता बब्रुवारन शिंदे, वय 51 वर्षे, व्यवसाय- मुख्याध्यापिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिग्गी रा. डिग्गी, ता. उमरगा जि. धाराशिव या त्यांचे शासकीय काम पार पाडत असताना नमुद आरोपीने सरकारी कामात अडथळा निर्माण करुन शिवीगाळी करत असताना श्रीराम जमादार पोलीस पाटील डिग्गी हे भांडण सोडवण्यास आले असता नमुद आरोपीने त्यांनाही शिवीगाळ करुन बुटाने मारहाण केली. व गावकरी सोडवण्यास आले असता त्यांनाही शिवीगाळ करुन सरकारी कामात अडथळा निर्माण केला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- श्रीमती सुनिता शिंदे यांनी दि.04.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे कलम 353, 354, 323, 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.