कळंब : आरोपी मयत नामे-कैलास कालिदास केंद्रे, वय 27 वर्षे हे व सोबत फिर्यादी नामे- अरविंद रामधान केंद्रे, वय 28 वर्षे, दोघे रा. धावडी ता.आंबाजोगाई जि. बीड हे दोघे दि.27.01.2024 रोजी 21.30 वा. सु. कन्हेरवाडी पाटीजवळून मोटरसायकल क्र एमएच 04 3829 ही वरुन जात होते. दरम्यान आरोपी नामे कैलास केंद्रे यांनी त्यांचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगई व निष्काळजीपणे चालवून रोडचे साईडपट्टीवर असलेल्या मातीचे ढिगाऱ्यास धडक देवून स्वत: व अरविंद केंद्रे हे किरकोळ व गंभीर जखमी होवून स्वत:चे मरणास कारणीभुत झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अरविंद केंद्रे यांनी दि.28.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304(अ) सह 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : फिर्यादी नामे- महेंद्र शिवलाल मेघवंशी, वय 25 वर्षे, रा. बलाई मोहल्ला स्पसपुरा जिल्हा भिलवाडा राजस्थान हे दि. 28.01.2024 रोजी 07.00 ते 08.00 वा. सु. चौर यांचे हॉटेलसमोर रोडवर बिडकडे जाणारे रोउवर धाराशिव येथुन कंटेनर क्र एच आर ई 4668 हे घेवून जात असताना कंटेनर क्र एच आर 38 वाय 9909 चा चालक आरोपी नामे- विरेंद्रसिंग पंचमलाल यादव रा. कोसंबी उत्तरप्रदेश यांनी त्यांचे ताब्यातील कंटेनर हा हायगई व निष्काळजीपणे रॉग साईडने चालवून फिर्यादीचे कंटेनरला समोरुन धडक दिली. या अपघातात महेंद्र मेघवंशी यांना किरकोळ व गंभीर जखमी करुन अपघाताची माहिती न देता व जखमीस उपचार कामी दवाखान्यात न नेता तसाच निघून गेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- महेंद्र मेघवंशी यांनी दि.28.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, सह 134 (अ) (ब), 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मद्यपी चालकावर गुन्हा दाखल
उमरगा : आरोपी नामे-1) गोपाळ ज्ञानोबा मसलगे, वय 24 वर्षे, रा. करला ता. औसा जि. लातुर हे दि.28.01.2024 रोजी 18.15 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 24 एसी 7693 ही आरोग्य नगरी कार्नर येथे डिवायडरच्या बाजूला मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.