बेंबळी :आरोपी नामे- 1)सगजिर्या जमनाश्या शिंदे,2) विकी सगजिर्या शिंदे, 3) कवि सगजिर्या शिंदे रा. सुंभा ता. जि. धाराशिव यांनी दि.28.01.2024 रोजी 08.00 वा. सु. सुंभा येथे फिर्यादी नामे- कृष्णा श्रावण शिंदे, वय 25 वर्षे, रा. सुंभा, ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी तु माझा मुलगा चोरीमध्ये नसताना मुद्दामहुन नाव घेतलेस या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, कुह्राडीचे दांडा, कत्तीने वार करुन गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादी यांची पत्नी भांडण सोडवण्यास आली असता त्यांनाही नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- कृष्णा शिंदे यांनी दि.28.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो. ठाणे येथे 326, 324, 323, 504,34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
बेंबळी :आरोपी नामे-1)कृष्णा श्रावण शिंदे, वय 25 वर्षे, रा. सुंभा ता. जि. धाराशिव यांनी दि.28.01.2024 रोजी 08.00 वा. सु. सुंभा येथे फिर्यादी नामे- कविता सगजिर्या शिंदे, वय 40 वर्षे, रा. सुंभा, ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी व कत्तीने डोक्यात मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादीचे पती सगजिर्या शिंदे हे भांडण सोडवण्यास आले असता त्यांनाही नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. व घर पेटवुन देवुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- कविता शिंदे यांनी दि.28.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो. ठाणे येथे 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मुरुम :आरोपी नामे-1) परमेश्वर अपाण्णा जमादार, वय 45 वर्षे, रा. कंटेकुर ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि. 27.01.2024 रोजी 18.30 वा. सु. मुरुम ते कंटेकुर जाणारे रोडवर सिद्राम हावगोळ यांचे शेताजवळ फिर्यादी नामे-दिंगबर विश्वनाथ शिंदे, वय 65 वर्षे, रा. कंटेकुर ता. उमरगा जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने मागील भांडणाचे कारणावरुन मोटरसायकल आडवी लावून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, कुह्राडीच्या लाकडी दांड्याने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- दिगंबर शिंदे यांनी दि.28.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो. ठाणे येथे 324, 323, 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.