उमरगा : मयत नामे- युनुस उर्फ साहिल घुडुसाब शेख, वय 25 वर्षे, रा. दत्त मंदीर जवळ बलसुर ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.23.01.2024 रोजी 10.30 वा. सु. रमेश बिराजदार यांचे पेट्रोलपंपाचे जवळ बलसुर गावाकडे लाणारे रोडवर उभा होते. दरम्यान ट्रॅक्टर क्र एमएच 25 एएस 1451 च्या चालकाने त्यांचे ताब्यातील ट्रॅक्टर हा हायगई व निष्काळजीपणे चालवून युनुस शेख यांना समोरुन धडक दिली. या अपघातात युनुस शेख हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- शहानवाज अमीन बडगिरे, वय 23 वर्षे, रा. दत्तमंदीर जवळ बलसुर ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.27.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304(अ) सह 134 (अ) (ब), 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : मयत नामे- 1)गौतम नामदेव माळी, वय 50 वर्षे, 2) आशा गौतम माळी, वय 45 वर्षे, रा. वडगांव सि. ता. जि. धाराशिव हे दोघे दि.25.01.2024 रोजी 12.00 ते 12.15 वा. सु. वडगांव येथुन चिलवडी येथे मोटरसायकल क्र एमएच 25 एव्ही 7960 वरुन जात होते. दरम्यान चिलवडी रोडवर चिलवडी शिवारात पिकअप क्रं एमएच 45 टी. 3458 च्या चालकाने त्यांचे ताब्यातील पिकअप हे हायगई व निष्काळजीपणे चालवून गौतम माळी यांचे मोटरसायकलला समोरुन धडक दिली. या अपघातात गौतम माळी व आशा माळी हे दोघे गंभीर जखमी होवून मयत झाले. सदर पिकअप चालक हा अपघाताची माहिती न देता जखमीस दवाखान्यात न नेता पिकअप जागीच सोडून पसार झाला. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा नामे- महादेव गौतम माळी, वय 25 वर्ष, रा. वडगांव सि. ता. जि. धाराशिव यांनी दि.27.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 338, 304(अ) सह 134 (अ) (ब), 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मारहाण
उमरगा :आरोपी नामे-1)आकाश राठोड, 2)विशाल राठोड,3)सुनिता राठोड, 4)निकीता चव्हाण, 5)गिता चव्हाण, सर्व रा. बलसुर तांडा ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.26.01.2024 रोजी 15.00 वा. सु. बलसुर तांडा येथे फिर्यादी नामे- आउबाई जयराम चव्हाण, वय 27 वर्षे, रा. बलसुर तांडा, ता. उमरगा जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने पाण्याची मोटर बंद करण्याच्या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी रॉड, दगडाने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- आउबाई चव्हाण यांनी दि.27.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे 324, 323 504, 506, 143, 147,148,149 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.