नळदुर्ग आणि परिसरात मागील काही दिवसांपासून चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. पोलीस रात्रीची गस्त घालण्याऐवजी झोपा काढत असल्याने चोर निर्ढावले आहेत. मागील आठ दिवसात १५ हुन अधिक चोऱ्या झाल्या आहेत.
फिर्यादी नामे-इमाम नजिर शेख, वय 35 वर्षे, रा. काटगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव हे काम करीत असलेल्या मालकाचे शगुन गोट फार्मचे दोन्ही गेट अज्ञात व्यक्तीने दि. 08.01.2024 रोजी 19.00 ते दि. 09.01.2024 रोजी 08.00 वा. सु. उघडुन एम अर्मिचर मशिन, एक भरडा गिरणी, एक कडबा कुटी, एक लोख्ंडी घवान व लोखंडी गेट, बोरची 3 एचपीची मोटार असा एकुण 1,25,000 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला.अश्या मजकुराच्या फिर्यादी नामे- इमाम शेख यांनी दि.27.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
फिर्यादी नामे-गोविंद महादेव पाटील, वय 67 वर्षे, रा. व्यवसाय हेल्पर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. रा. सलगरा म ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी त्यांचे घरासमोरील भिंती लगत विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ची अंदाजे 20,000₹ किंमतीची एफ.पी.एस.आय.डी थंब मशीन चार्जींग ला लावून तुळजापूर येथे कामानिमीत्त गेले असता दि.25.01.2024 रोजी 10.30 ते 17.00 वा. सु. फिर्यादीचे घरासमोरुन चांर्जींगला लावलेली एफ.पी.एस. आय. डी मशीन ही अज्ञात व्यक्तीने चांरुन नेली. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- गोविंद पाटील यांनी दि.27.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापुरात चोरी
तुळजापूर : फिर्यादी नामे-रुपा देवेंद्र गोकरर्णकर, वय 37 वर्षे, रा. ढोरगल्ली भवानी रोड तुळजापूर वेस सोलापूर ता. जि. सोलापूर हे बसस्थानक तुळजापूर येथे बसमध्ये चढत असताना रुपा गोकरर्णकर यांच्या गळ्यातील 50 ग्रूम वजनाचे सोन्याचे गंठन अंदाजे 1,80,000₹ किंमतीचे हे दि. 25.01.2024 रोजी 16.15 वा. सु. अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेवून चोरुन नेले. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- रमेश गोसावी यांनी दि.26.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.