धाराशिव : अंबेहोळ रोडच्या लगत असलेल्या हॉटेल बालाघाट कॅफेटेरिया व्हेज नॉनव्हेज बिअरबार रेस्टॉरंट ॲड लॉजवर अनैतिक देह व्यापार करणा-या हॉटेल व लॉजवर पोलिसांनी छापा मारून दोन महिलांची सुटका केली तसेच लॉज मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी नामे- किरण महादेव गुरव, वय 33 वर्षे, व्यवसाय (हॉटेल/लॉज मालक) रा. तांबरी विभाग गणपती मंदीर जवळ धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी स्वताच्या आर्थिक फायद्यासाठी दि.08.04.2024 रोजी 15.00 वा सु जुनोणी रोड अंबेहोळ रोडच्या लगत हॉटेल बालाघाट कॅफेटेरिया व्हेज नॉनव्हेज बिअरबार रेस्टॉरंट ॲड लॉज धाराशिव येथे दोन महिलास वाणिज्यिक प्रयोजनाकरीता आश्रय देउन त्यास ग्राहकांचे मागणी प्रमाणे लैंगीक समागमनाकरीता करीता पराववृत्त करुन तिला वैश्या व्यवसाय करण्यास भाग पाडून तिच्यावरती उपजिवीका करीत असताना पंचा समक्ष मिळून आला. यावरुन पोलीसांनी छापा कारवाई करुन यातील पिडीत दोन महिलेंची सुटका करुन सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.स. कलम 370, सह अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम कलम 4, 5, 6, 7 अन्वये धाराशिव शहर पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
हाणामारीचे तीन गुन्हे दाखल
तुळजापूर :आरोपी नामे-1) अभिषेक कोळेकर,(पाटील), 2) अण्णा हणुमंत कोळेकर (पाटील), 3) सतिष वसंत कोळेकर( पाटील), 4)मुकेश वसंत कोळेकर(पाटील) 5) रोहीत मुकेश कोळेकर (पाटील) सर्व रा. मोर्डा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 09.04.2024 रोजी 10.00 वा. सु. गावातील वेशीत मोर्डा येथे फिर्यादी नामे-अजय अरविंद ढेकळे, वय 19 वर्षे, रा. मोर्डा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी अंगावर थुकंण्याच्या कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठी व विटाचे तुकड्याने डोक्यात मारहाण करुन जखमी केले.व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे अजय ढेकळे यांनी दि.09.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे 324, 323, 504, 506, 143, 147, 149 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर :आरोपी नामे- 1)संतोष महादेव कांबळे, 2) रामचरण संतोष कांबळे, 3) किशोर तुकाराम करंडे, 4) दत्ता तुकाराम करंडे, 5) मयुर मोहन साळुंके, 6) धोंडीबा शामराव चंदनशिवे, 7) महादेव मस्सा कांबळे, 8)प्रेम धनाजी कांबळे, सर्व रा. वडगांव लाख ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 08.04.2024 रोजी 20.45 वा. सु. वडगाव लाख शिवारातील वैशाला शिंदे यांचे शेतात रोडवर फिर्यादी नामे- शिवराज उर्फ महेश राजेंद्र मेटे, वय 27 वर्षे, रा. वडगांव लाख ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना शेतातुन का आला या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉड, कुह्राडीचे तुंबा व काठीने मारहाण करुन जखमी केले.तसेच फिर्यादीचे नातेवाईक उमेश मेटे, निखील मेटे यांनाही शिवीगाळ करुन कुह्राडीचे तुंब्याने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. भांडणामध्ये फिर्यादीच्या गळ्यातील दोन तोळ्याची साकळी हिसकावून घेतली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे शिवराज मेटे यांनी दि.09.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे 294, 327, 324, 506, 143, 147,148, 149 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा :आरोपी नामे-1)राम उध्दव चव्हाण,2)विष्णु नागनाथ शिंदे दोघे रा. मुळज ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि. 07.04.2024 रोजी 19.00 वा. सु. मुळज यथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील रस्त्यावर फिर्यादी नामे- माणिक विठ्ठल केशवे, वय 42 वर्षे, रा. मुळज ता. उमरगा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लाकडाने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे माणिक केशवे यांनी दि.09.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे 324, 323, 504, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.