धाराशिव : आरोपी नामे- यशवंत संजय माळी, 2) संजय संभाजी माळी, 3) मनोहर संभाजी माळी, 4) दयानंद संभाजी माळी सर्व रा. वडगाव सि. ता. जि. धाराशिव यांनी दि. 12.05.2024 रोजी 16.30 वा. सु. माळी समाजाचे समाज मंदीराजवळ वडगाव सिध्देश्वर येथे फिर्यादी नामे- रोहन दगडु मंगळे, वय 25 वर्षे, रा. वडगाव सि. ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉड, लाकडाने मारहाण करुन गंभीर जखमी केले. व तुला जिवे ठार मारतो अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- रोहन मंगळे दि. 18.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-326, 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
लोहारा : आरोपी नामे-हणमंत प्रकाश ढोबळे, रा. जेवळी उत्तर ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि. 10.05.2024 रोजी 20.00 वा. सु. सुलतान चिकन सेंटर जेवळी येथे फिर्यादी नामे- छाया संजय कल्यामोळ, वय 36 वर्षे, रा. जेवळी उत्तर ता. लोहारा जि. धाराशिव यांना व त्यांचा मुलगा सुनिल कल्यामोळ यांना नमुद आरोपीने मोटरसायकलने कट मारलेचे कारणावरुन शिवीगाळ करुन लोखंडी कटरने फिर्यादीच्या मुलास पोटावर मारुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- छाया कल्यामोळ यांनी दि. 18.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-324, 504, अन्वये गुन्हा नोंदवला आहे.