• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, August 4, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवच्या होमगार्ड कार्यालयात वादग्रस्त झिरो पोलिसाचा धिंगाणा

महिलांना शिवीगाळ, धमक्या देत अश्लील हावभाव केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

admin by admin
June 17, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
घेतलाय का ‘खाकी’चा इंगा? धाराशिव जिल्ह्यात ‘डुप्लिकेट’ पोलिसांचा सुळसुळाट; एका आठवड्यात तिघांना गंडा!
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : जिल्हा होमगार्ड प्रशिक्षण कार्यालयात महिलांना शिवीगाळ, दमदाटी आणि अश्लील हावभाव केल्याप्रकरणी वादग्रस्त झिरो पोलिसाविरोधात अखेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी विनयभंग आणि लाचखोरीच्या आरोपांमुळे चर्चेत असलेल्या या झिरो पोलिसाचा आणखी एक कारनामा समोर आल्याने संताप व्यक्त होत आहे.

पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, मंगळवारी (दि. १७ जून) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास जिल्हा होमगार्ड प्रशिक्षण कार्यालयात मोहरम बंदोबस्त वाटपाचे काम सुरू होते. यावेळी होमगार्ड कर्मचारी राधा अनिल गायकवाड यांनी संबंधितास, “तुम्ही कोण आहात? बंदोबस्त वाटप करणारे तुम्ही बाहेरचे लोक कसे?” असा प्रश्न विचारला.

या प्रश्नाचा राग मनात धरून संबंधित राम लक्ष्मण बोंदर  या झिरो पोलिसाने सरकारी कार्यालयातच महिलेला अश्लील हावभाव करून अपमानास्पद भाषा वापरल्याचा आरोप आहे. फिर्यादीनुसार, “जा तुला काय xx उपटायचे ते उपट” तसेच “काय भारी बांधायचे ते बांध” अशा स्वरूपाची भाषा वापरत संबंधिताने पीडितेला धमकी दिली. एवढ्यावरच न थांबता, “तू गेटच्या बाहेर भेट, मग तुला बघतो” अशी उघड धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी  राम लक्ष्मण बोंदर  विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २९२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७५(३), ७९, ३५१(२) आणि ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

याप्रकरणी धाराशिव लाइव्हने काही वेळापूर्वी बातमी दिली होती, होमगार्ड कार्यलयात धिंगाणा घातल्याचा व्हिडीओ प्रसारित केला होता. धाराशिव लाइव्हच्या दणक्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. 

विशेष म्हणजे, याच झिरो पोलिसाविरोधात काही दिवसांपूर्वी आनंदनगर पोलीस ठाण्यात एका खासगी रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्याशी अश्लील वर्तन करून विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याआधी धाराशिवच्या आठवडे बाजारात पोलिसांच्या संगनमताने लाच घेतल्याचे प्रकरणही समोर आले होते.

एका मागोमाग एक गंभीर आरोप समोर येत असतानाही संबंधितावर अद्याप कठोर कारवाई का होत नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधितास तात्काळ अटक करून निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

या प्रकरणात संबंधित झिरो पोलिसाचे आणि आठवडे बाजारातील कथित लाच प्रकरणात अडकलेल्या काही पोलिस कर्मचाऱ्यांचे साटेलोटे असल्याचा आरोपही केला जात आहे. गुन्हा दाखल होण्यापूर्वी संबंधित पोलिसांशी मोबाईलवर वारंवार संपर्क झाल्याचा दावा करण्यात येत असून, याबाबत कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) तपासणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

 

Previous Post

 ६ खासदार शिंदेंच्या वाटेवर, पण राजकीय वर्तुळात चर्चा फक्त ‘फायरब्रँड’ ओमराजेंचीच… का?

Next Post

ओमराजेंच्या शिंदे गटातील एन्ट्रीने जिल्ह्याची सत्ता समीकरण बदलणार ! नगर परिषद ते जिल्हा परिषदेत मोठी फूट पडणार …

Next Post
तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

ओमराजेंच्या शिंदे गटातील एन्ट्रीने जिल्ह्याची सत्ता समीकरण बदलणार ! नगर परिषद ते जिल्हा परिषदेत मोठी फूट पडणार ...

ताज्या बातम्या

बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

धाराशिवमध्ये दारूच्या नशेत ‘डायल ११२’ वर बॉम्बस्फोटाचा बनाव!

August 4, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिव जिल्ह्यात तीन चोरीचे गुन्हे; सौर प्रकल्पातील केबलसह अवैध वाळू साठ्याप्रकरणी गुन्हे दाखल

August 4, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

भूम – छोटा हत्ती’ गाडीतून ४ गोवंशीय जनावरांची सुटका; सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

तुळजापूर तालुक्यातील दिंडेगाव येथे जुन्या वादातून राडा!

August 4, 2026
धाराशिवमध्ये ‘एमडी’ ड्रग्सची विक्री करणारे दोघे जेरबंद

धाराशिवमध्ये ‘एमडी’ ड्रग्सची विक्री करणारे दोघे जेरबंद

August 4, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!