• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, November 22, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्हा परिषदेच्या आखाड्यात मोठा ट्विस्ट! दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार?

महायुती आणि आघाडीत बिघाडी; शिंदे गटातही अंतर्गत कलह शिगेला

admin by admin
January 19, 2026
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
धुरळा धाराशिवचा: नवऱ्यांची धावपळ अन्‌ बायकांची ‘खुर्ची’साठी धडपड!
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: जिल्ह्याचे ‘मिनी मंत्रालय‘ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धाराशिव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. एकूण ५५ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची चिन्हे आहेत. बुधवार ( २१ जानेवारी )  उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून, त्यापूर्वीच जिल्ह्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत.

दोन्ही राष्ट्रवादी येणार एकत्र?

राज्यात सत्तेत असलेली महायुती आणि विरोधातील महाविकास आघाडी या दोन्ही समीकरणांना धाराशिवमध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. स्थानिक पातळीवर ‘आघाडीत बिघाडी आणि महायुती तुटणार’ असे चित्र निर्माण झाले आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, अजित पवार गट आणि शरद पवार गट हे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे गट या निवडणुकीत एकत्र येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. महायुतीमधील अजित पवार गट शरद पवार गटासोबत गेल्याने भाजपची कोंडी झाली आहे.

भाजपची ‘एकला चलो रे’ ची भूमिका

राष्ट्रवादीच्या या स्थानिक समझोत्यामुळे भाजपने या निवडणुकीत स्वतंत्र लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे, शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि रासप (राष्ट्रीय समाज पक्ष) हे चार पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवणार असल्याचे समजते.

शिंदे गटात दोन तट, कार्यकर्ते सैरभैर

शिवसेना (शिंदे गट) मध्ये मात्र अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. पक्षात उघडपणे दोन गट पडल्याचे चित्र आहे:

  • पालकमंत्री प्रताप सरनाईक गट: सरनाईक यांची भूमिका भाजपसोबत युती करून लढण्याची आहे.

  • माजी मंत्री तानाजी सावंत गट: सावंत यांचे भूम, परंडा आणि वाशी या तालुक्यांमध्ये निर्विवाद वर्चस्व आहे. त्यांची भूमिका मात्र स्वतंत्र निवडणूक लढवून आपली वेगळी चूल मांडण्याची आहे.

नेत्यांच्या या परस्परविरोधी भूमिकांमुळे शिंदे गटातील कार्यकर्ते आणि उमेदवार मात्र सैरभैर झाले आहेत. अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना, धाराशिवच्या राजकारणात नक्की कोण कोणासोबत जाणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Previous Post

मोठा खुलासा! दोन्ही शिवसेना एकत्र येणार? तानाजी सावंत-ओमराजेंच्या ‘त्या’ गुप्त भेटीचे सत्य आले समोर

Next Post

वडनेर येथे चिंचेच्या झाडाच्या फांद्या तोडण्यावरून तरुणाला दगडाने मारहाण; एकाच कुटुंबातील तिघांवर गुन्हा दाखल

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

वडनेर येथे चिंचेच्या झाडाच्या फांद्या तोडण्यावरून तरुणाला दगडाने मारहाण; एकाच कुटुंबातील तिघांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : शहरात मटका अड्ड्यांवर पोलिसांची धडक मोहीम

November 21, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

 निष्काळजीपणे गॅस शेगडी वापरून जीव धोक्यात घातल्याप्रकरणी ६ जणांविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल

November 21, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : शेत रस्त्यावर माती पसरवल्याचा जाब विचारल्याने ६६ वर्षीय वृद्धासह पुतण्याला काठी व दगडाने बेदम मारहाण

November 21, 2026
एआय (AI) क्षेत्रातील ‘आर्थिक फुगा’ फुटण्याच्या उंबरठ्यावर

एआय (AI) क्षेत्रातील ‘आर्थिक फुगा’ फुटण्याच्या उंबरठ्यावर

November 21, 2026
कळंब – चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या, पतीला जन्मठेप

ज्ञानराज चौगुले, अनिल जगताप यांच्या न्यायालयीन लढ्याला यश!

November 20, 2026

Recent Posts

  • धाराशिव : शहरात मटका अड्ड्यांवर पोलिसांची धडक मोहीम
  •  निष्काळजीपणे गॅस शेगडी वापरून जीव धोक्यात घातल्याप्रकरणी ६ जणांविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल
  • धाराशिव : शेत रस्त्यावर माती पसरवल्याचा जाब विचारल्याने ६६ वर्षीय वृद्धासह पुतण्याला काठी व दगडाने बेदम मारहाण
  • एआय (AI) क्षेत्रातील ‘आर्थिक फुगा’ फुटण्याच्या उंबरठ्यावर
  • ज्ञानराज चौगुले, अनिल जगताप यांच्या न्यायालयीन लढ्याला यश!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!