धाराशिव- राज्यातील गोशाळांमधील गायींच्या परिपोषणासाठी प्रत्येक गायीस प्रतिदिन 100 रुपये अनुदान मिळण्यासाठी जिल्ह्यातील नोंदणीकृत गोशाळा आणि त्यामधील गोवंशीय पशुधनाची संख्या याबाबतची माहिती तात्काळ सादर करण्याबाबत प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त (लातूर) डॉ. सोनवणे यांनी धाराशिवचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांना पत्राद्वारे कळविले आहे. सरकारच्या या भूमिकेचे धाराशिव जिल्ह्यातून स्वागत होत आहे. येडेश्वरी गुरुकुल गोशाळा, स्वदेशी सेना व वैद्य नवनाथ दुधाळ यांनी राज्य सरकारकडे वारंवार केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून यापुढे गायी कत्तलखान्यास जाण्यापासून वाचतील, असे मत दुधाळवाडी येथील वैद्य नवनाथ दुधाळ यांनी व्यक्त केले.
गोवंश संवर्धनांसाठी गोशाळांमधील गायींना दरमहा 3000 रुपये अनुदान मिळावे मिळावे याकरिता गेल्या दोन-अडीच वर्षापासून सरकारकडे सतत पाठपुरावा करण्यात येत होता. राज्यातील गोशाळा, स्वदेशी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मदन दुबे , सुहास (बापू) देशमुख, स्व. राजीव दीक्षित यांच्या विचारांचे सर्व सहकारी *मार्गदर्शक* अॅड.नीलेश ओझाजी आणि वकील टीम, अंबरजी अध्यक्ष अवेकन इंडिया (AIM) व टीम, विश्व शक्ती पार्टीचे डॉ.तरुण कोठारी, डॉ.अभय छेडाजी, प्रेरणा : शंकराचार्यजी, डॉ.देवेंद्र बल्लारा व जनता सरकार मोर्चा (JSM) टीम, डॉ. स्नेहा होनराव, डॉ.विलास जगदाळे, डॉ बिश्व रुपम चौधरी, प्रेरणा विलास भाई शहा (शेवटचे महात्मा गांधी सोलापूर), शैलेंद्र नावडे, अरुण शाळू महाराज, सुवर्णा यादव,अण्णा झाडबुके, महेश भंडारी, धन्यकुमार पटवा, विजय यादव, सुधीर बहिरवडे तुळशीदास मस्के, गोकुळ खरडकर, गहिनीनाथ रितोंड, मंगेश मोरे, अनिल अवधूत, गणेश टेकाळे, बाळू कांबळे, अमोल चव्हाण, नवनाथ दुधाळ (धाराशिव) यांच्यासह पंचगव्य चिकित्सक, गोभक्त, गोरक्षकांनी वारंवार या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधले होते.
अखेर सरकारने सकारात्मक भूमिका घेऊन प्रत्येक जिल्ह्यातील नोंदणीकृत गोशाळा आणि त्यामधील गोवंशीय पशुधनाची संख्या संकलित करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त (लातूर) कार्यालयांतर्गत धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्यातील जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्तांना आपल्या जिल्ह्यातील नोंदणीकृत गोशाळांची संख्या तसेच सदर गोशाळेत असलेल्या गोवंशीय पशुधनाची संख्या याबाबतची माहिती तात्काळ विधिमंडळ कामकाजाच्या अनुषंगाने सादर करण्याबाबत कळविलेले आहे. सरकारचा हा निर्णय गोवंशीय पशुधन संवर्धनासाठी शेतकऱ्यांसाठी व कॅन्सरला कंट्रोल करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचेही वैद्य नवनाथ दुधाळ यांनी म्हटले आहे.