वाशी : मयत नामे-विनायक रंगनाथ शिंदे, व सोबत ललुबाई विनायक शिंदे हे दोघे दि.05.07.2024 रोजी 18.30 वा. सु. पारगाव जवळ रोडवरून मोटरसायकल वरुन जात होते. दरम्यान मोटरसायकल क्र एमएच 12 जीयु 8072 चा चालकाने त्याचे ताब्यातील मोटर सायकल ही हायगई व निष्काळजीपणे रॅग साईडने चालवून विनायक शिंदे यांचे मोटरसायकलला समोरुन धडक दिली.या अपघातात विनायक शिंदे हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तसेच ललुबाई शिंदे या गंभीर जखमी झाल्या. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-ज्ञानेश्वर विनायक शिंदे, वय 25 वर्षे, रा. इंद्रा पारधी पीडी पारा ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि.08.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भारतीय न्याय सहिंता कलम 106(1) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा : दि. 29.06.2024 रोजी 23.00 वा. सु. एनएच 65 रोडवर धनराज भोसले यांचे हॉटेलसमोर तलमोड येथे अनोळखी बेवारस इसम वय अंदाजे 55 वर्षे, यास अज्ञात वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन हे हायगयीने व निष्काळजीपणे चालवून अनोळखी इसमास धडक देवून गंभीर जखमी करुन त्याचे मरणास कारणीभुत झाला व त्यास उपचार कामी न नेता तसाच निघून गेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- बालाजी दत्तात्रय कामतकर, पोलीस हवालदार/151 नेमणूक उमरगा पोलीस ठाणे जि. धाराशिव यांनी दि.08.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम 279, 304(अ) सह 134 अ. ब. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.