ढोकी – धाराशिव तालुक्यातील तावरजखेडा येथे सोयाबीनच्या गंजीला विनाकारण आग लावून २ ते अडीच लाख रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रघुनाथ शिवमुर्ती फेरे यांनी हे कृत्य केल्याचा आरोप आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री साडे दहा ते २९ सप्टेंबर रोजी पहाटे साडेचार वाजेपर्यंतच्या दरम्यान रघुनाथ फेरे यांनी तावरजखेडा शिवारातील शेत गट क्रमांक ९ मध्ये पांडुरंग रामभाउ फेरे यांच्या सोयाबीनच्या गंजीला आग लावली. या आगीत पांडुरंग फेरे यांचे २ ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले.
याप्रकरणी अनिता नाईकनवरे यांनी १७ ऑक्टोबर रोजी ढोकी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ३२६(फ), ३५२, ३५१(२), (३) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.