• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, October 17, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या हक्काच्या निधीवर ‘टक्केवारी’चा आरोप

 आमदार कैलास पाटलांकडून उच्चस्तरीय चौकशीची मागणी

admin by admin
August 23, 2026
in राजकारण
Reading Time: 1 min read
धाराशिव विधानसभा : “क्यों पड़े हो चक्कर में , कोई नहीं है टक्कर में! वनसाईड कैलास पर्व”

patil

0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : निवासी दिव्यांग शाळांना अनुदान मिळवून देण्यासाठी मंत्रालयीन पातळीवर कथित ‘टक्केवारी’ची मागणी होत असल्याचा गंभीर दावा एका संस्थापकाने केल्याचे सांगत आमदार कैलास पाटील यांनी सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या हक्काच्या निधीवर अशाप्रकारे डल्ला मारला जात असेल, तर ही बाब सामाजिक न्याय व्यवस्थेला काळिमा फासणारी असल्याची टीका त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे केली आहे.

दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षण, निवास आणि सुरक्षित भविष्याची संधी देणाऱ्या निवासी दिव्यांग शाळांची अवस्था सध्या अत्यंत दयनीय असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. शाळांची दुरवस्था केवळ प्रशासनाच्या उदासीनतेमुळेच नव्हे, तर अनुदानासाठी कथित ‘टक्केवारी’ची मागणी होत असल्याच्या आरोपामुळेही होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

समाजातील सर्वाधिक गरजू घटकातील मुले ज्या शाळांमध्ये शिक्षण घेतात, त्या संस्थांना निधीसाठी मंत्रालयाच्या फेऱ्या माराव्या लागत असतील आणि अनुदान मिळवण्यासाठी कथित टक्केवारी द्यावी लागत असेल, तर सरकारच्या कारभाराची ही लाजिरवाणी अवस्था असल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.

एकीकडे सरकारकडून दिव्यांग कल्याण आणि सर्वसमावेशक शिक्षणाच्या घोषणा केल्या जात आहेत. मात्र, दुसरीकडे निवासी दिव्यांग शाळांना तीन-तीन वर्षांचे अनुदान मिळत नसेल, शिक्षक व कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्रलंबित असतील आणि विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांवर त्याचा परिणाम होत असेल, तर या घोषणांचा उपयोग काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच प्रलंबित तीन वर्षांचे अनुदान तातडीने वितरित करावे, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या हक्काच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घालू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, ‘टक्केवारी’च्या मागणीबाबत करण्यात आलेल्या आरोपांची वस्तुनिष्ठ चौकशी होऊन सत्य समोर येणे आवश्यक आहे. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी संबंधित निधी आणि सुविधांचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी या निमित्ताने पुढे आली आहे.

Previous Post

“काड्या करणारे पत्रकार लिफ्टमध्ये अडकले!” बकुळाबाईंच्या ‘मिनी’ दरबारातील राडा !

Next Post

तुळजापूर : माळुंब्रा फाट्याजवळ सोलापूरच्या तरुणाचा खून; अनैतिक संबंधांच्या संशयातून कृत्य

Next Post
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

तुळजापूर : माळुंब्रा फाट्याजवळ सोलापूरच्या तरुणाचा खून; अनैतिक संबंधांच्या संशयातून कृत्य

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव जिल्ह्यात अपहरणाच्या दोन घटना; ढोकीत ५२ वर्षीय व्यक्ती तर आनंदनगरमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता

October 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : ‘आमच्याकडे रागाने का बघतोस?’ म्हणून २४ वर्षीय तरुणावर कोयता, काठी अन् बेल्टने हल्ला

October 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

खामसवाडी : प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून कॉम्प्युटर सेंटरचालकावर चाकू अन् लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला

October 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

जळकोट शिवार : शेतीच्या वादातून रक्तरंजित थरार; चाकू व दगडाने प्राणघातक हल्ला करून तरुणाला केले गंभीर जखमी

October 17, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

भंडारी शिवार : हॉटेलमध्ये नेहमी रागावल्याचा मनात धरला राग; ओडिशातून आलेल्या वेटरने डोक्यात वार करून मालकाचाच केला निर्घृण खून

October 17, 2026

Recent Posts

  • धाराशिव जिल्ह्यात अपहरणाच्या दोन घटना; ढोकीत ५२ वर्षीय व्यक्ती तर आनंदनगरमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता
  • उमरगा : ‘आमच्याकडे रागाने का बघतोस?’ म्हणून २४ वर्षीय तरुणावर कोयता, काठी अन् बेल्टने हल्ला
  • खामसवाडी : प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून कॉम्प्युटर सेंटरचालकावर चाकू अन् लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला
  • जळकोट शिवार : शेतीच्या वादातून रक्तरंजित थरार; चाकू व दगडाने प्राणघातक हल्ला करून तरुणाला केले गंभीर जखमी
  • भंडारी शिवार : हॉटेलमध्ये नेहमी रागावल्याचा मनात धरला राग; ओडिशातून आलेल्या वेटरने डोक्यात वार करून मालकाचाच केला निर्घृण खून
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!