धाराशिव येथील व्ही.आर. स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या 32 वर्षीय रत्नदीप रोहिदास झेंडे यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर स्विमिंग पूल व्यवस्थापक हनुमंत श्रीमंत तांबे, अभय हनुमंत तांबे आणि प्रशांत मुंदडा यांच्याविरुद्ध धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयत रत्नदीप झेंडे हे 5 मे 2024 रोजी दुपारी 3 वाजता व्ही.आर. स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी गेले होते. त्यांना पोहता येत नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी मदतीसाठी ओरड केली. मात्र, स्विमिंग पूल व्यवस्थापकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. मयत रत्नदीप यांना बराच वेळ उशिरा पाण्याबाहेर काढण्यात आले आणि त्यांना वेळेत वैद्यकीय उपचार मिळू शकले नाहीत. यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे मयताचे वडील रोहिदास झेंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी सांगितले.
मयत नामे-रत्नदिप रोहीदास झेंडे, वय 32 वर्षे, रा. तांबरी विभाग लिंबोणी बाग धाराशिव ता. जि. धाराशिव हे दि.05.05.2024 रोजी 15.00 वा. सु.उपळा शिवारात व्ही.आर.स्विमींग पुल वरुडा रोड येथे पोहण्यासाठी गेला असता त्यास पोहता येत नसल्याने त्याने व्ही आर स्वीमींग सेंटर पुल व्यवस्थापक व सुरक्षा रक्षक यांना कळवून देखील व्ही. आर. स्वीमींग पुल व्यवस्थापक आरोपी नामे हनुमंत श्रीमंत तांबे, अभय हनुमंत तांबे, प्रशांत मुंदडा यांनी याग्ये खबरदारी न घेता दुर्लक्ष व निष्काळजीपणा केल्यामुळे रत्नदिप झोंडे हे पाण्यात बुडाला असता नमुद आरोपींनी मयत यास उशीरा पाण्याचे बाहेर काढल्याने त्यास वेळेत औषध उपचारास घेवून न गेल्याने रत्नदिप झेंडे हे मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- रोहीदास भगवान झेंडे, वय 68 वर्षे, रा. तांबरी विभाग लिंबोणी बाग गणपती मंदीराचे पाठीमागे धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि.06.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 304(अ), 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.