उमरगा – एकुरगा येथील शेत गट 47/1 मध्ये शनिवारी दुपारी शेतीच्या वादातून एका कुटुंबावर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेत श्रीधर किसन जेवळे (वय 30) आणि त्यांच्या आईला मारहाण करण्यात आली. तसेच, त्यांच्या राहत्या घराचे पत्र्याचे शेड पाडून जनावरांच्या कोट्याला आग लावण्यात आली. या हल्ल्यात अंदाजे 1,50,000 रुपयांचे नुकसान झाले आहे.
या प्रकरणी गोविंद व्यंकट जेवळे, अनिता गोविंद जेवळे, मनोज ज्ञानदेव जेवळे, वैभव गोविंद जेवळे, गजानन दत्तात्रय जेवळे, वैशली गजानन जेवळे, योगेश दिगंबर जेवळे, दयानंद गजानन जेवळे यांच्यासह अन्य दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादींना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर फिर्यादी श्रीधर जेवळे यांनी रविवारी उमरगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.