वाशी तालुक्यातील खैराट वस्ती ( पारधी वस्ती ) येथे पती-पत्नीमधील वाद विकोपाला गेला. या वादातून पती दत्ता शिंदे याने आपली पत्नी सोनाबाई दत्ता शिंदे (वय २५ वर्षे) हिच्यावर बंदुकीतून गोळी झाडली. यात सोनाबाईचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
वाशी तालुक्यातील खैराट वस्ती येथे एका भयानक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. नवरा-बायकोमधील नेहमीचा वाद विकोपाला जाऊन पतीने आपल्या पत्नीवर गोळी झाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे. चारित्र्याच्या संशयावरून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
या घटनेची माहिती मयत सोनाबाई दत्ता शिंदे हिचे वडील वसंत देवराव काळे यांनी पोलिसांना दिली. या प्रकरणी दत्ता आबा शिंदे आणि आबा मच्छिंद्र शिंदे या दोघांविरुद्ध वाशी पोलीस ठाण्यात भादंवि कलम 302, 351(3), 3(5) सह कलम 3, 9, 25 शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे .
मयत सोनाबाई यांचे शव शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये आणण्यात आले होते. मात्र, येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन न करता वाशीच्या डॉक्टरला बोलावले. यामुळे शवविच्छेदन प्रक्रियेवरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
नेमकं काय घडलं?
- वाशी तालुक्यातील पारा गावजवळील खैराट वस्ती येथे राहणारे दत्ता शिंदे आणि त्यांची पत्नी सोनाबाई (वय २५ वर्षे) यांच्यात काही कारणावरून कडाक्याचे भांडण झाले.
- हे भांडण इतके विकोपाला गेले की, संतप्त झालेल्या दत्ता शिंदे यांनी आपल्या बंदुकीतून सोनाबाई यांच्यावर गोळी झाडली.
- गोळी लागल्याने सोनाबाई यांचा जागीच मृत्यू झाला.
- घटनेची माहिती मिळताच वर्षी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह ताब्यात घेतला.
- या प्रकरणी दत्ता आबा शिंदे आणि आबा मच्छिंद्र शिंदे या दोघांविरुद्ध वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे खैराट वस्तीमध्ये शोककळा पसरली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.