• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, April 6, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

राजेबोरगावात बंद घर फोडले; ७५ ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास, बेंबळी पोलिसांत गुन्हा दाखल

admin by admin
February 13, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास
0
SHARES
232
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: राजेबोरगाव (ता. जि. धाराशिव) येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. या घरफोडीत एकूण ४६,९०० रुपये किमतीचा ऐवज लंपास करण्यात आला असून, याप्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तात्या हरीदास पाटील (वय ४७, रा. राजेबोरगाव) यांचे घर दिनांक ०९ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपासून ते १० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत बंद होते. या कालावधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील ७५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (किंमत ४६,९०० रुपये) चोरून नेले.

याप्रकरणी तात्या पाटील यांनी १२ फेब्रुवारी २०२६ रोजी बेंबळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३१(४) (रात्री घरफोडी) आणि ३०५(ए) (चोरी) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास बेंबळी पोलीस करत आहेत.

शिराढोण पाझर तलावावरून शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी व ग्रामपंचायतीची केबल चोरीला

तुळजापूर: शिराढोण (ता. तुळजापूर) येथील पाझर तलावावरून अज्ञात चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या दोन विद्युत मोटारी आणि ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेची केबल चोरून नेल्याची घटना १२ फेब्रुवारीच्या पहाटे उघडकीस आली आहे.

याबाबत कुंदन नामदेव सोनवणे (वय ४५, रा. शिराढोण) यांनी तुळजापूर पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादीची आणि विलास मनोहर लाटे यांची प्रत्येकी ५ एचपी क्षमतेची ‘लाडालक्ष्मी’ कंपनीची मोटर (एकूण किंमत २८,००० रुपये) तसेच ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा मोटरची १५० फूट केबल असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.

याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तामलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोऱ्यांचे सत्र

तामलवाडी: तामलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटना उघडकीस आल्या आहेत. यात सुरतगाव येथील कंपनीतून ॲल्युमिनीयमची वायर आणि काटी येथून शेतकऱ्याची म्हैस चोरट्यांनी पळवून नेली आहे.

पहिली घटना (सुरतगाव): सुरतगाव येथील अशोक बिल्डकॉन प्रा. लि. कंपनीच्या साईटवरून अज्ञात चोरट्याने ७० हजार रुपये किमतीची १६०० मीटर ॲल्युमिनीयम वायर चोरून नेली. ही घटना २ ते १० फेब्रुवारी दरम्यान घडली. याप्रकरणी अक्षयकुमार हरीदास बचाटे (वय ३१, रा. आरण, ता. माढा) यांनी फिर्याद दिली आहे.

दुसरी घटना (काटी): काटी (ता. तुळजापूर) येथील रमेश नागनाथ जामगावकर (वय ३३) यांच्या शेतातून ३५ हजार रुपये किमतीची एक म्हैस अज्ञात चोरट्याने चोरून नेली.

या दोन्ही घटनांबाबत १२ फेब्रुवारी २०२६ रोजी तामलवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


वाशी तालुक्यात पवनचक्कीवर डल्ला; ३० लाखांची केबल चोरी तर ४० लाखांचे नुकसान, ६ जणांवर गुन्हा

वाशी: तालुक्यातील गोजवाडा आणि कन्हेरी शिवारातील पवनचक्की प्रकल्पांवर चोरट्यांनी मोठा डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी तब्बल ३० लाख रुपये किमतीच्या तांब्याच्या केबल्स चोरून नेल्या असून, साहित्याची तोडफोड करून ४० लाख रुपयांचे नुकसान केले आहे. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना ११ ते १२ फेब्रुवारी २०२६ च्या दरम्यान घडली. फिर्यादी रोहन सुरेश निकम (वय ३५, रा. तुळजापूर, मूळ रा. नाशिक) यांच्या तक्रारीनुसार, गोजवाडा येथील जीओजे-०१ आणि कन्हेरी येथील एलएक्स-०१ या पवनचक्कींवर हा प्रकार घडला.

आरोपींनी पवनचक्कीच्या साइटवरून ३० बंडल (१५० स्क्वेअर) आणि १८ बंडल (१२० स्क्वेअर) कॉपर केबल असा एकूण ३० लाख रुपयांचा मुद्देमाल चोरला. तसेच कंट्रोल पॅनलची केबल आणि जनरेटरची तोडफोड करून कंपनीचे ४० लाख रुपयांचे नुकसान केले.

गुन्हा दाखल असलेले आरोपी: राजेंद्र गुलाब काळे, माणिक गुलाब काळे, दया माणिक काळे (सर्व रा. कासारखाणी पारधी पिढी, वाशी), रामा सुब्राव काळे, बबलू मधुकर शिंदे (रा. तेरखेडा) आणि सिचन बापू शिंदे (रा. ईटकुर, ता. कळंब).

याप्रकरणी वाशी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२), ३२४(५) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

तुळजापुरात जुन्या भांडणातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; विटा, रॉड आणि दगडाने हल्ला, परस्परविरोधी गुन्हे दाखल

Next Post

 धाराशिव : नगरपालिकेच्या पहिल्याच सभेत कचऱ्याच्या प्रश्नावरून सत्ताधारी-विरोधकांत खडाजंगी

Next Post
धाराशिवमध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन

 धाराशिव : नगरपालिकेच्या पहिल्याच सभेत कचऱ्याच्या प्रश्नावरून सत्ताधारी-विरोधकांत खडाजंगी

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

शेतातील २८ हजारांची केबल चोरीला; नळदुर्ग पोलिसांत दोघांवर गुन्हा दाखल

April 5, 2026
काक्रंबा पाटीजवळ भीषण अपघात : टेम्पो पुलाच्या कठड्याला धडकला; चार वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू, सात जण जखमी

रस्ता ओलांडताना भरधाव वाहनाची धडक; ८० वर्षीय वृद्धाचा मृत्यू

April 5, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

दारूच्या नशेत स्वतःच्या वडिलांसह भावाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण; ईट येथील धक्कादायक घटना

April 5, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

येणेगूर येथे ट्रॅक्टर लावण्याच्या वादातून राडा; मध्यस्थी करणाऱ्या महिलेचे दगडाने मारून पाडले ५ दात

April 5, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

येरमाळ्यात पोलिसाच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न; शासकीय कामात अडथळा, सात जणांवर गुन्हा दाखल

April 5, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group