• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, August 10, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

स्मार्ट मीटर व लोडशेडिंगविरोधात शिवसेनेचे महावितरण कार्यालयावर चक्काजाम आंदोलन

विविध मागण्यांचे निवेदन सादर

admin by admin
July 16, 2026
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
स्मार्ट मीटर व लोडशेडिंगविरोधात शिवसेनेचे महावितरण कार्यालयावर चक्काजाम आंदोलन
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : स्मार्ट मीटरची सक्ती, अघोषित लोडशेडिंग, कमी दाबाचा वीजपुरवठा आणि शेतकऱ्यांच्या वीज समस्यांविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने गुरुवारी धाराशिव येथील महावितरण मंडळ कार्यालयासमोर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

आंदोलनात आमदार कैलास पाटील, मकरंद राजेनिंबाळकर, युवासेना जिल्हाप्रमुख रवी वाघमारे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक, शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शिवसेनेने दिलेल्या निवेदनात धाराशिव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वीजनिर्मिती होत असतानाही शेतकऱ्यांना नियमित, योग्य दाबाने वीजपुरवठा मिळत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे. शेतीपंपांसाठी दिवसा सलग किमान आठ तास अखंडित वीजपुरवठा देण्यात यावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. कमी दाबामुळे पंप सुरू होत नसल्याने मोटारी जळत असून पिकांचे नुकसान होत असल्याचाही आरोप करण्यात आला.

तसेच वारंवार होणारे वीज खंडित होणे, आपत्कालीन लोडशेडिंग आणि अनियमित वीजपुरवठ्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर तसेच महिला वर्गाच्या दैनंदिन कामकाजावर याचा परिणाम होत असल्याचेही सांगण्यात आले.

स्मार्ट मीटरबाबतही शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत ग्राहकांच्या स्पष्ट संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया तात्काळ थांबविण्याची मागणी केली. तसेच ज्या ग्राहकांनी लेखी अर्ज करून जुन्या मीटरची मागणी केली आहे, त्यांना पूर्वीचे मीटर पुन्हा बसवून देण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

प्रमुख मागण्या

  • शेतकऱ्यांना दिवसा किमान ८ तास नियमित व योग्य दाबाने वीजपुरवठा.
  • कमी दाबाचा वीजपुरवठा तात्काळ सुधारावा.
  • अनावश्यक आपत्कालीन लोडशेडिंग बंद करावे.
  • वारंवार होणारे वीज खंडित होणे रोखण्यासाठी देखभाल व दुरुस्तीची कामे तातडीने करावीत.
  • ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया थांबवावी.
  • मागणी करणाऱ्या ग्राहकांना पूर्वीचे वीज मीटर पुन्हा बसवून द्यावेत.
  • ग्रामीण भागातील विद्यार्थी व महिलांसाठी नियमित वीजपुरवठा सुनिश्चित करावा.

या सर्व मागण्यांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने महावितरण प्रशासनाकडे करण्यात आली.

Previous Post

निसर्गाच्या सानिध्यात विठूनामाचा गजर… हरित वारीची नवी पाऊलवाट

Next Post

तुळजापूर पंचायत समितीत हायव्होल्टेज ड्रामा! थेट बीडीओंच्या दालनात पेट्रोल फेकले

Next Post
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

तुळजापूर पंचायत समितीत हायव्होल्टेज ड्रामा! थेट बीडीओंच्या दालनात पेट्रोल फेकले

ताज्या बातम्या

धाराशिव कृषी निविष्ठा घोटाळा : कोणते अधिकारी निलंबित?

धाराशिव कृषी निविष्ठा घोटाळा: १४ अधिकाऱ्यांचे निलंबन, मात्र २९ शेतकरी उत्पादक आणि २ निर्मिती कंपन्यांना ‘राजाश्रय’

August 10, 2026
तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

३६ महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई द्या

August 9, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

कळंब बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठन लंपास

August 9, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिव तालुक्यात गायी विक्रीच्या बहाण्याने शेतकऱ्याची फसवणूक!

August 9, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

मागील भांडणाचा राग मनात धरून अचलेर येथे एकास मारहाण; मुरुम पोलिसांत ८ जणांवर गुन्हा दाखल

August 9, 2026

Recent Posts

  • धाराशिव कृषी निविष्ठा घोटाळा: १४ अधिकाऱ्यांचे निलंबन, मात्र २९ शेतकरी उत्पादक आणि २ निर्मिती कंपन्यांना ‘राजाश्रय’
  • ३६ महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई द्या
  • कळंब बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठन लंपास
  • धाराशिव तालुक्यात गायी विक्रीच्या बहाण्याने शेतकऱ्याची फसवणूक!
  • मागील भांडणाचा राग मनात धरून अचलेर येथे एकास मारहाण; मुरुम पोलिसांत ८ जणांवर गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!