• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, October 15, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

येडशी येथील दगडू देशमुख खून प्रकरणाचा २४ तासांत छडा!

पत्नीनेच प्रियकराला दिली होती सुपारी; मुख्य आरोपीसह तिघांना पुणे व धाराशिवमधून अटक; एलसीबी व ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई

admin by admin
July 15, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: तालुक्यातील येडशी येथील तरुण शेतकरी संतोष उर्फ दगडू बाबासाहेब देशमुख यांच्या निर्घृण खून प्रकरणाचा धाराशिव ग्रामीण पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवघ्या २४ तासांत छडा लावला आहे. अनैतिक संबंधांचा काटा दूर करण्यासाठी मयताच्या पत्नीनेच आपल्या प्रियकराला पतीच्या खुनाची सुपारी दिल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी या खळबळजनक प्रकरणात मयताची पत्नी, तिचा प्रियकर आणि त्याच्या एका साथीदाराला पुणे व धाराशिव येथून अटक केली आहे.

रक्ताच्या थारोळ्यात आढळला होता मृतदेह; दुचाकीवरून पटली ओळख

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १३ जुलै २०२६ रोजी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुमाळवाडी शिवारात एका पुरुषाचा रक्ताळलेला मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, सपोनि हाके, पोउपनि संदीप ओव्हाळ यांच्या पथकाने लागलीच घटनास्थळी धाव घेतली.

घटनास्थळी ४० ते ४५ वर्षे वयोगटातील व्यक्तीचा गळा चिरून व दगडाने ठेचून खून केल्याचे स्पष्ट दिसत होते. मृतदेहाच्या जवळच एक हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल उभी होती. पोलिसांनी या दुचाकीच्या क्रमांकावरून तांत्रिक माहिती काढून मयताची ओळख पटवली. मृत व्यक्ती ही येडशी येथील दगडू देशमुख असल्याचे निष्पन्न झाले.

अनैतिक संबंधांची माहिती मिळताच पोलिसांची चक्रे फिरली

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राऊत आणि स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली.

तपासादरम्यान पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, मयताची पत्नी दैवशाला हिचे बार्शी तालुक्यातील एका तरुणासोबत अनैतिक प्रेम संबंध आहेत. या माहितीवरून पोलिसांनी मुख्य संशयित आरोपी बालाजी महादेव पायघन याचा शोध सुरू केला. तो आपल्या मेहुण्यासोबत पुण्याला पळून गेल्याचे समजताच धाराशिव पोलिसांनी पुणे पोलिसांशी संपर्क साधून तांत्रिक मदतीने त्याला घेराव घातला.

पुण्यातून दोघांना तर धाराशिवमधून पत्नीला बेड्या

पोलिसांनी पुणे येथे छापा टाकून मुख्य आरोपी बालाजी पायघन याला त्याचा साथीदार सोमनाथ सातनाक याच्यासह ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. मयताची पत्नी दैवशाला हिच्या सांगण्यावरून व तिने दिलेल्या सुपारीवरून आम्ही दोघांनी कुमाळवाडी शिवारात दगडू देशमुख यांना गाठून चाकूने वार केले आणि दगडाने ठेचून त्यांचा खून केला, अशी कबुली आरोपींनी दिली. पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ कारवाई करत तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत:

  • अटक केलेल्या आरोपींची नावे:

    १) बालाजी महादेव पायघन (वय ३५ वर्षे, रा. सातनाक वस्ती, पांगरी, ता. बार्शी, जि. सोलापूर – प्रियकर)

    २) सोमनाथ सातनाक (रा. पांगरी, ता. बार्शी – साथीदार)

    ३) दैवशाला संतोष देशमुख (रा. येडशी, ता. जि. धाराशिव – मयताची पत्नी).

तपास पथकाचे कौतुक

सदरची उत्कृष्ट कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीणचे पोनि वासुदेव मोरे, एलसीबीचे पोनि विनोद इज्जपवार, सपोनि हाके, पोउपनि संदीप ओव्हाळ, पोलीस हवालदार माचेवाड, खोसे, गादेकर, ढगारे, घुगे, पोलीस नाईक सावंत, पोलीस शिपाई पडवळ, आरसेवाड, स्वामी, गवळी, बनाळे तसेच महिला पोलीस हवालदार बांगर आणि सोन्ने यांच्या संयुक्त पथकाने केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे करत आहेत.

Previous Post

येडशी जंगलाजवळ तरुण शेतकऱ्याचा गळा चिरून निर्घृण खून

Next Post

निसर्गाच्या सानिध्यात विठूनामाचा गजर… हरित वारीची नवी पाऊलवाट

Next Post
निसर्गाच्या सानिध्यात विठूनामाचा गजर… हरित वारीची नवी पाऊलवाट

निसर्गाच्या सानिध्यात विठूनामाचा गजर... हरित वारीची नवी पाऊलवाट

ताज्या बातम्या

साहेबांचा जुना ‘भोंगा’ आणि माऊलींचा नवा ‘सायरन’! ‘व्हिजन २०३०’ च्या गोड कल्पना आणि फसव्या घोषणा!

‘चौकशी’च्या नाटकामागे स्वतःच्या पीएला वाचवण्याचा राणा पाटील यांचा आटापिटा?

October 14, 2026
संत गोरोबा काका मंदिर विकास आराखड्यातील अनियमिततेविरोधात ५ नोव्हेंबरपासून आमरण उपोषणाचा इशारा

संत गोरोबा काका मंदिर विकास आराखड्यातील अनियमिततेविरोधात ५ नोव्हेंबरपासून आमरण उपोषणाचा इशारा

October 14, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

भूम, परंड्यात घरफोडी; सोन्याचे दागिने, रोकड, कपडे आणि शेळी लंपास

October 14, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

सव्वापाच लाखांचा ट्रॅक्टर घेतला अन् अवघे १५०० रुपये फोन पे करून दिला ६ लाखांचा बाऊन्स चेक

October 14, 2026
तुळजाभवानी मंदिरात व्हीआयपी वशिलेबाजी अन् बनावट पासेसचे रॅकेट?

तुळजाभवानी मंदिरात व्हीआयपी वशिलेबाजी अन् बनावट पासेसचे रॅकेट?

October 14, 2026

Recent Posts

  • ‘चौकशी’च्या नाटकामागे स्वतःच्या पीएला वाचवण्याचा राणा पाटील यांचा आटापिटा?
  • संत गोरोबा काका मंदिर विकास आराखड्यातील अनियमिततेविरोधात ५ नोव्हेंबरपासून आमरण उपोषणाचा इशारा
  • भूम, परंड्यात घरफोडी; सोन्याचे दागिने, रोकड, कपडे आणि शेळी लंपास
  • सव्वापाच लाखांचा ट्रॅक्टर घेतला अन् अवघे १५०० रुपये फोन पे करून दिला ६ लाखांचा बाऊन्स चेक
  • तुळजाभवानी मंदिरात व्हीआयपी वशिलेबाजी अन् बनावट पासेसचे रॅकेट?
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!