मुरुम – मुरुम पोलिसांनी बुधवारी रात्री एका आयशर टेंपोमधून बेकायदेशीरपणे जनावरे वाहतूक करताना चार जणांना अटक केली आहे. टेंपोमध्ये 61 म्हशींचे रेडे आढळून आले असून, त्यांना दाटीवाटीने बांधून निर्दयतेने कत्तलीसाठी नेले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई मुरुम मोड येथे रात्री साडेअकराच्या सुमारास करण्यात आली. एपी 29 टीबी 9618 क्रमांकाच्या टेंपोमध्ये जनावरे वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून टेंपो ताब्यात घेतला. टेंपोमध्ये एकूण 61 म्हशींचे रेडे आढळून आले. त्यांची किंमत 5,13,500 रुपये असल्याचा अंदाज आहे.
याप्रकरणी पोलिसांनी चॉदपाशा महेबुब शेख (वय 41, रा. अलमप्रभु कॉलनी, एलबीएस नगर, रायचुर, कर्नाटक), महमंद युसुफ सफदरअली कुरेशी (वय 38), मस्तान सफदरअली कुरेशी (वय 44) आणि तोहर अब्दुलनबी कुरेशी (वय 55, सर्व रा. शंकर नगर, ओल्ड मलकपेठ, विटीसी, अंबरपेठ, हैद्राबाद, तेलंगणा) या चौघांना अटक केली आहे.
त्यांच्याविरुद्ध प्राण्यास क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम कलम 11(1) (ए) (डी) (एच), सह 119 म.पोका 1951 सह प्राणी संरक्षण कायदा सुधारित 1995 कलम 5(अ), 5(ब) व 9 सह भा.न्या सं कलम 3 (5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.