• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, July 11, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

इलोव्हा कारमधून विदेशी दारूची चोरटी वाहतूक; स्थानिक गुन्हे शाखेची येडशीत कारवाई, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

admin by admin
May 22, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
इलोव्हा कारमधून विदेशी दारूची चोरटी वाहतूक; स्थानिक गुन्हे शाखेची येडशीत कारवाई, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
662
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: येडशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने सापळा रचून इनोव्हा कारमधून होणारी विदेशी दारूची चोरटी वाहतूक पकडली. या कारवाईत पोलिसांनी ६ लाख ३४ हजार ६०० रुपयांच्या मुद्देमालासह दोन आरोपींना अटक केली आहे. गुरुवारी (दि. २१) सायंकाळच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, धाराशिव जिल्ह्यातील मालमत्तेविषयीचे गुन्हे उघडकीस आणणे, फरार आरोपींचा शोध घेणे आणि अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंगवर होते. हे पथक येडशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आले असता, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांना गुप्त बातमीदाराकडून एक खात्रीशीर माहिती मिळाली. एका इनोव्हा कारमधून (क्र. एमएच १५ बीएक्स ६८२०) अवैध विदेशी दारूची चोरटी वाहतूक केली जात असल्याची ती माहिती होती.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने तातडीने चौकात नाकेबंदी करून सापळा रचला. सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास संशयित इनोव्हा कार येताना दिसली. पोलिसांनी कार थांबवून चालकाची चौकशी केली असता, त्याने आपले नाव सुभाष भीमराव उर्फ लाला काळे (वय ३३, रा. कन्हेरवाडी, ता. कळंब, जि. धाराशिव) असे सांगितले.

पोलिसांनी कारची सखोल पाहणी केली असता, पाठीमागील सीटवर आणखी एक इसम बसलेला आढळला. त्याचे नाव दादा रामा काळे (वय ४६, रा. जुना बस डेपो, पारधी पिढी, धाराशिव) असल्याचे निष्पन्न झाले. सीटच्या पाठीमागील भागात विदेशी दारूचे बॉक्स लपवून ठेवण्यात आले होते. पोलिसांनी दारूचे बॉक्स आणि इनोव्हा कार असा एकूण ६ लाख ३४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद ईज्जपवार, सपोनि अमोल मोरे, पोलीस अंमलदार बळीराम शिंदे, अमोल चव्हाण आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल दहीहांडे यांच्या पथकाने केली.

Previous Post

धाराशिवच्या शांतिनिकेतन कॉलनीत जागेच्या वादातून वृद्ध महिलेला मारहाण; पाच जणांविरुद्ध आनंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल

Next Post

पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांवर एफआयआर दाखल करा!

Next Post
धाराशिव विधानसभा : “क्यों पड़े हो चक्कर में , कोई नहीं है टक्कर में! वनसाईड कैलास पर्व”

पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांवर एफआयआर दाखल करा!

ताज्या बातम्या

धाराशिव पीक विमा: उच्च न्यायालयाच्या निकालाने शेतकऱ्यांना धक्का, कंपनीला दिलासा

हरवलेल्या विवाहित महिलेला शोधून न्यायालयात हजर करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

July 10, 2026
‘हिंदुत्ववादी सरकारनेच आई तुळजाभवानीच्या सुरक्षेशी तडजोड केली का?’

‘हिंदुत्ववादी सरकारनेच आई तुळजाभवानीच्या सुरक्षेशी तडजोड केली का?’

July 10, 2026
रेल्वेचा पाठपुरावा सूर्यराजेंचा, अन् ट्रॅकवर ‘सेल्फी’ फेसबुक पिंट्याचा! ‘बोरूबहाद्दरां’चे साहेबांना खुले आव्हान!

रेल्वेचा पाठपुरावा सूर्यराजेंचा, अन् ट्रॅकवर ‘सेल्फी’ फेसबुक पिंट्याचा! ‘बोरूबहाद्दरां’चे साहेबांना खुले आव्हान!

July 10, 2026
धाराशिवच्या 500 खाटांच्या जिल्हा रुग्णालयाला गती; पहिल्या टप्प्यात ₹18.46 कोटींच्या निधीला मंजुरी

धाराशिवच्या 500 खाटांच्या जिल्हा रुग्णालयाला गती; पहिल्या टप्प्यात ₹18.46 कोटींच्या निधीला मंजुरी

July 9, 2026
तुळजापूर मंदिर प्रशासनाचा खुलासा म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’!

तुळजापूर मंदिर प्रशासनाचा खुलासा म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’!

July 9, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group