• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, November 14, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवमध्ये मोठी कारवाई, आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यास अटक; ५ मोटारसायकली जप्त

admin by admin
July 6, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिवमध्ये मोठी कारवाई, आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यास अटक; ५ मोटारसायकली जप्त
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: जिल्ह्यात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. एका आंतरराज्यीय दुचाकी चोराला अटक करून त्याच्याकडून २ लाख ६० हजार रुपये किमतीच्या पाच मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. महादेव उर्फ गगन अरुण शिंदे (वय २२, रा. मस्सा, ता. कळंब) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यात गस्त घालत होते. यावेळी, मस्सा येथील महादेव शिंदे याने चोरलेल्या मोटारसायकली आपल्या पत्र्याच्या शेडमध्ये लपवून ठेवल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.

या माहितीच्या आधारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके यांच्या पथकाने तात्काळ मस्सा येथे जाऊन संशयित आरोपी महादेव शिंदे याला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या मोटारसायकली येरमाळा, धाराशिव, ढोकी, तामलवाडी आणि कर्नाटक राज्यातून चोरल्याचे त्याने सांगितले.

पोलिसांनी केलेल्या तपासात या मोटारसायकलींसंदर्भात येरमाळा, ढोकी, आनंदनगर, तामलवाडी आणि कर्नाटक राज्यातील लाकाल पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून पाचही मोटारसायकली जप्त केल्या असून, पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला मुद्देमालासह आनंदनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

सदरची यशस्वी कामगिरी पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, अमोल मोरे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पार पाडली. या कारवाईमुळे जिल्ह्यातील आणि परराज्यातील अनेक दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

Previous Post

कर्जमाफीच्या ‘योग्य वेळे’चे सरकारने स्पष्टीकरण द्यावे

Next Post

धाराशिव जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र सुरूच; घरफोडी, वाहनचोरी आणि शेतमालाच्या चोरीने नागरिक त्रस्त

Next Post
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र सुरूच; घरफोडी, वाहनचोरी आणि शेतमालाच्या चोरीने नागरिक त्रस्त

ताज्या बातम्या

धाराशिव: मध्यरात्री जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ९ जणांवर गुन्हा दाखल, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

ढोकीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; १३ जणांवर गुन्हा दाखल, १ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त

November 14, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात शेती साहित्याच्या चोऱ्यांचा सुळसुळाट

November 14, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

कळंब : डिकसळ येथील विवाहित तरुणाचे अज्ञातांकडून अपहरण

November 14, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : करार व मोबदला देऊनही कंपनीची वाहने अडवून ३ लाखांची खंडणी मागितली

November 14, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

उमरगा : बसस्थानकावरील गर्दीचा फायदा घेत तरुणीच्या पर्समधील सोन्याचे दागिने लंपास

November 13, 2026

Recent Posts

  • ढोकीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; १३ जणांवर गुन्हा दाखल, १ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त
  • धाराशिव जिल्ह्यात शेती साहित्याच्या चोऱ्यांचा सुळसुळाट
  • कळंब : डिकसळ येथील विवाहित तरुणाचे अज्ञातांकडून अपहरण
  • धाराशिव : करार व मोबदला देऊनही कंपनीची वाहने अडवून ३ लाखांची खंडणी मागितली
  • उमरगा : बसस्थानकावरील गर्दीचा फायदा घेत तरुणीच्या पर्समधील सोन्याचे दागिने लंपास
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!