धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात शिपाई आणि लिपिक पदावर नोकरी लावतो म्हणून तरुणांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार मोठ्या साहेबाचा मेहुणाच असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे!
“डील” थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात!
- नोकरीचे आमिष दाखवून तरुणांकडून ३ ते ४ लाख रुपये उकळले गेले.
- पैशांची देवाणघेवाण ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच झाली, म्हणजेच हा खेळ मोठ्या वरदहस्ताखालीच सुरू होता.
- अणदूरमधील एका मोबाइल विक्रेत्याचा कमिशनबाज मध्यस्थ म्हणून यात सहभाग होता.
“तेरी भी चूप, मेरी भी चूप!” – नळदुर्ग पोलिसांची सुसंवाद योजना?
- फसवणुकीचा अर्ज एक महिना आधी दाखल झाला, तरीही गुन्हा दाखल नाही.
- पोलीस कारवाई करण्याऐवजी ‘तपास सुरू आहे’ असे सांगत वेळ मारून नेत आहेत.
- आता प्रश्न असा की नळदुर्ग पोलिसांना वरून दबाव आहे की चिरीमिरी मिळाल्यानेच त्यांची गुपचूप भूमिका?
“मोठ्या साहेबाचा मेहुणा” – संरक्षण कुणाचे?
- मुख्य सूत्रधारावर कारवाई का नाही?
- जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात हे सुरू होत असेल, तर यंत्रणाच या रॅकेटचा भाग आहे का?
फसवणूक झालेल्या तरुणांसाठी महत्वाची सूचना!
फसवणूक झालेल्या तरुणांनी आपली तक्रार नळदुर्ग पोलिसात नोंदवावी तसेच धाराशिव लाइव्हकडे तिची प्रत पाठवावी.
धाराशिव लाइव्ह या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा करीत आहे.
➡ संपर्क करा: 7387994411
“गुन्हा कधी?” की “तपास सुरूच?”
फसवणुकीचे बळी ठरलेले तरुण न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत, पण पोलीस मात्र “तेरी भी चूप, मेरी भी चूप” च्या धोरणावर ठाम आहेत! या प्रकरणात पुढील अपडेटसाठी ‘धाराशिव लाइव्ह’ पाहत राहा!