कळंब – येथील येरमाळा-कळंब मार्गावर एका भरधाव कारचा अपघात होऊन एका तरुणाचा मृत्यू झाला असून तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
महिंद्रा एक्सयूव्ही ३०० (क्र. एमएच १२ व्हीएल ६९२१) या चारचाकी वाहनातून निखील महादेव फाटक, निखील अशोक कांबळे, वैभव महादेव शिंदे आणि विशाल बोंदर हे येरमाळा ते कळंब या मार्गावर प्रवास करत होते. मस्सा खं. गावाजवळील २०० मीटर अंतरावर आरोपी निखील फाटक याने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवित असताना एका अज्ञात ट्रॅक्टरला कारची जोरदार धडक बसली.
या अपघातात निखील कांबळे (२४, रा. कळंब) हे गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला, तर वैभव शिंदे, निखील फाटक आणि विशाल बोंदर हे तिघेही जखमी झाले.
या घटनेबाबत वैभव शिंदे यांनी ७ मार्च रोजी कळंब पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून निखील महादेव फाटक याच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम २८१, १२५(अ), १२५(ब), १०६(१) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.