उमरगा : उमरगा पोलिसांनी 20 लहान-मोठे घोडे क्रूरपणे वाहतूक करणाऱ्या दोन जणांना अटक केली आहे. मोहम्मद मोईल पटेल (वय 31) आणि मैनोद्दीन रमजान सय्यद यांना 6 मार्च 2025 रोजी रात्री 11.58 वाजता उमरगा बायपास रोडवर गंधर्व हॉटेलसमोर अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आयशर टेम्पो (क्रमांक टीएस 12 यूडी 1703) मध्ये सुमारे 1,10,000 रुपये किमतीचे 20 लहान-मोठे घोडे क्षमतेपेक्षा जास्त दाटीवाटीने भरून त्यांची योग्यरित्या वाहतूक करत होते. तसेच, त्यांनी घोड्यांसाठी पुरेसे अन्न आणि पाण्याची व्यवस्थाही केली नव्हती. यावरून पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध प्राण्यांना क्रूरपणे वागण्यास प्रतिबंध अधिनियम कलम 11 (1), 11 (1) सह कलम 83, 177 मोवाका अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी टेम्पोसह एकूण 6,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या घटनेचा पुढील तपास उमरगा पोलीस करत आहेत.
वाशी पोलिसांकडून गोवंशियांची क्रूरपणे वाहतूक करणाऱ्या एकाला अटक; चार जर्सी गायी जप्त
वाशी : वाशी पोलिसांनी चार जर्सी गायींची क्रूरपणे वाहतूक करणाऱ्या अजिम अब्दुल पठाण (रा. भूम, जि. धाराशिव) याला अटक केली आहे. 7 मार्च 2025 रोजी दुपारी 3 वाजता पार्डी फाटा येथे ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी एमएच 25 एजे 5309 या पिकअप व्हॅनमध्ये सुमारे 60,000 रुपये किमतीच्या चार जर्सी गायी क्षमतेपेक्षा जास्त दाटीवाटीने भरून त्यांची योग्यरित्या वाहतूक करत होता. तसेच, त्याने गायींसाठी पुरेसे अन्न आणि पाण्याची व्यवस्थाही केली नव्हती. यावरून पोलिसांनी त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम 5(अ), 5(ब), 9(ब), 11, प्राण्यांना क्रूरपणे वागण्यास प्रतिबंध अधिनियम कलम 11 (1), 11(1)(अ),11(1)(एच),11(1) (एफ), 11(1) (आय) सह कलम 47, 54, 56 प्राण्यांचे परिवहन अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी व्हॅनसह एकूण 4,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या घटनेचा पुढील तपास वाशी पोलीस करत आहेत.